अंकिता लोखंडेचा पती विकी जैन ‘बिग बॉस १७’ नंतर घराघरांत पोहोचला. विकी जैन फिनालेमध्ये पोहोचण्याआधीच बिग बॉसच्या घराबाहेर पडला होता. विकीची पत्नी अंकिता लोखंडे टॉप ५ मध्ये गेली होती. बिग बॉसच्या सिझनमध्ये विकी जैन हा कोणत्या ना कोणत्या वादात सापडताना दिसला. व्यवसायाने उद्योजक असलेला विकी बिग बॉसच्या घरात आपली वेगळी ओळख तयार करण्यासाठी आला होता. यात त्याला यशही आलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

अंकिताचा पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकीने सगळ्यांना तितकीच टक्कर देत बिग बॉसमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं. आता विकी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. विकी त्याच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल होताना दिसतोय.

हेही वाचा… अवघ्या १५व्या वर्षात विद्या बालन पडली होती प्रेमात, पहिल्या ब्रेकअपचा किस्सा सांगत म्हणाली, “त्याने मला…”

विकीने त्याच्या सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोजमध्ये विकीने काळ्या रंगाचा डिझायनर सेट परिधान केला आहे. या सेटवर मोठं फूल असलेलं एक जॅकेट आहे. डोळ्यात काजळ आणि हटके पोज देत विकीने हे फोटोशूट केलंय. तर दुसऱ्या फोटोत त्याने ऑफ-व्हाईट रंगाची डिझायनर शेरवानी परिधानी केलीय. रोहित वर्मा या सेलिब्रिटी डिझायनरने विकीसाठी हे कपडे निवडलं.

विकीच्या पत्नीने “वाह” अशी कमेंट या फोटोला केली. तर कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी विकीला या लूकवरून खूप ट्रोल केलं आहे. “विकी स्वत:चे हाल तू कसे करून घेतलेस?” असं एका नेटकऱ्याने लिहिलं. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हा काय वेडा झालाय का?” “तुला काम नाही मिळणार आहे भावा” असं तिसरा म्हणाला.

“सर तुम्ही ही पोस्ट काढून टाका का स्वत:ची बदनामी करून घेताय?” असंही एकाने लिहिलं. “करण जोहरसारखा वाटतोय”, “क्या से क्या होगया देखते देखते”, “लहान मुलांना घाबरवायची नवी पद्धत” अशा अनेक कमेंट्स विकीच्या या लूकवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

विकी आणि अंकिताचा म्यूझिक व्हिडीओ ‘ला पिलादे शराब’ नुकताचं प्रदर्शित झाला आहे. बिग बॉसनंतर या व्हिडीओद्वारे विकी पहिल्यांदाच मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.

हेही वाचा… लवकरच बाबा होणाऱ्या रणवीर सिंहने सांगितला काशीमध्ये दर्शन घेतल्याचा अनुभव, म्हणाला, “माझ्या कुटुंबाची आता…”

दरम्यान, विकीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनने डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापूर्वी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.