टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्याच्या घटस्फोटाबद्दलच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. ‘नागिन’ फेम अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं असून तो आणि त्याची पत्नी विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विजयेंद्र कुमेरिया टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘नागिन’, ‘छोटी बहू’, ‘तुम्हारी पाखी’, ‘शास्त्री सिस्टर्स’ आणि ‘आपकी नजरों ने समझा’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

“चांगल्या कामासाठी काही लोकांना आकर्षित…” बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याबद्दल स्पष्टच बोलली प्रियांका चोप्रा

विजयेंद्र कुमेरिया सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी प्रिती भाटिया हिने एक पोस्ट केली होती, त्या पोस्टमुळे त्या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याची चर्चा आहे. प्रीती भाटियाने तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “तू आतापर्यंत बोललेल्या सर्व खोट्यांपैकी एक, जेव्हा तू म्हणाला, ‘आय लव्ह यू’, हे माझं आवडतं होतं आणि ‘आय मिस यू’ हे माझं दुसरं आवडतं होतं. खूप आठवण येत आहे.” प्रीतीच्या या कॅप्शनमुळे कदाचित तिच्या आणि पती विजयेंद्रमध्ये सर्व काही ठीक चालले नाहीये, अशी शंका लोकांना येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फक्त प्रीतीच्या कॅप्शनमुळे त्यांच्या नात्यातील दुराव्याची चर्चा होत नहाीये, तर विजयेंद्र आणि प्रितीने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलोही केले आहे. दोघेही एकमेकांना फॉलो करत नाहीत. विजयेंद्रच्या इन्स्टा फीडवर क्वचितच त्याच्या पत्नीसोबतचा फोटो असेल. डिसेंबर २०२२ पासून प्रीतीच्या इन्स्टा फीडवरही तिच्या पतीसोबत एकही फोटो शेअर केलेला नाही. या दोघांना एक मुलगी देखील आहे.