मुंबई फिल्मसिटीमध्ये मालिकांच्या सेटवर बिबटे शिरण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी एका हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या शिरल्याचं समोर आलंय. सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बिबट्या आल्यानंतर सेटवर लोक पळताना पाहायला मिळत आहे.

रणदीप हुडाने एक ग्लास दुध अन् खजूर खाऊन घटवलं २६ किलो वजन? खुलासा करत म्हणाला, “मी स्पष्ट…”

काल (२६ जुलै रोजी) मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये एका मराठी टीव्ही मालिकेच्या सेटवर बिबट्या आपल्या बछड्यासह घुसला. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “सेटवर २०० हून अधिक लोक उपस्थित होते, एखाद्याला जीव गमवावा लागला असता. गेल्या १० दिवसांत बिबट्या शिरल्याची ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. सरकार यावर ठोस उपाययोजना करत नाहीये.”

या बिबट्याला पाहून उपस्थितांची तारांबळ उडाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लोक सैरावैरा पळत आहेत. तसेच मालिकेच्या सेटवर बिबट्या चालत जाताना दिसत आहे. अचानक बिबट्या शिरल्याचं पाहून लोक घाबरले होते.

“त्याला अभिनयाचा अ देखील येत नाही आणि तो…”, ‘गदर २’ चा ट्रेलर पाहून अभिनेत्याने उडवली खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘कलर्स’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘नीरजा’ या मालिकेच्या सेटवर बिबट्या आला होता. त्यानंतर अभिनेता शोएब इब्राहिमच्या ‘अजूनी’ मालिकेच्या सेटवर बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. मालिकेचे शूट सुरु असताना अचानक सेटवर बिबट्या आल्याने एकच गोंधळ उडाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.