तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. बॉयफ्रेंड शीझान खानशी ब्रेकअप झाल्यामुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तुनिषाच्या कुटुंबियांनी शीझानचे दुसऱ्या मुलीशीही प्रेमसंबंध असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे शीझानला शिक्षा व्हावी, अशी मागणी तिच्या आईने केली आहे.

तुनिषाला फसवल्याचा आरोप तिच्या आईने शीझानवर केला आहे. दुसऱ्या मुलीबरोबरही त्याचे प्रेमसंबंध असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. “याच महिन्यात शूटिंगदरम्यान सेटवरच तुनिषाने शीझानचा मोबाईल हातात घेतला होता. तेव्हा चुकून तिने त्याचा मोबाईल तपासला. शीझान एका मुलीशी डेटिंगबाबत बोलत असल्याचं चॅट तिला सापडले. ते चॅट वाचून तुनिषाला धक्का बसला”, असं तिची आई म्हणाली.

हेही वाचा>>तुनिषाने याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यावेळी मी…”; अटकेत असलेल्या शीझान खानचा धक्कादायक खुलासा

हेही वाचा>>‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिक झळकणार मोठ्या पडद्यावर; सलमान खानच्या चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुनिषाने याबाबत शीझानला विचारले असता आता मला तुझ्याबरोबर राहायचं नाही , असं तो तिला म्हणाला. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तुनिषाच्या आईने याबाबत शीझानच्या आईला जाबही विचारला होता. माझ्या मुलीबरोबर राहायचं नव्हतं, तर तो तिच्या आयुष्यात का आला? यावर त्याच्या आईने “दोघांनी एकत्र यायचा निर्णय घेतला होता. आता याबद्दल मी काय बोलू”, असं त्या म्हणाल्या”, असा खुलासा तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी केला आहे.

हेही वाचा>>लग्नानंतर कुंकू न लावल्यामुळे देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणतात “तू पुढची तुनिषा शर्मा…”

२४ डिसेंबरला तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या मृतदेहावर २७ डिसेंबरला अंत्यसंस्कार होणार आहेत.