Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding Details: कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ७० दिवसांच्या प्रवासानंतर चौथी रनर अप राहिलेली अंकिता सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने बिग बॉसच्या घरात तिच्या लग्नाचा विषय काढला होता. लग्नाची तयारी चालू आहे, पण त्याच दरम्यान बिग बॉसची संधी आल्याने शोमध्ये यायचं ठरवलं असं तिने सांगितलं होतं.

अंकिता होणाऱ्या पतीला कोकण हार्टेड बॉय या नावाने हाक मारायची. मात्र तो नेमका कोण आहे, याबाबत तिने सांगितलं नव्हतं. त्यामुळे अंकिताचा होणारा पती कोण आहे? याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. अखेर अंकिताने ती ज्याच्याशी लग्न करणार आहे, त्याच्याबद्दल खुलासा केला आहे.

सूर जुळले…! म्हणत कोकण हार्टेड गर्लने अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा, नावही आलं समोर

अंकिता प्रभू वालावलकरने आधी सांगितल्याप्रमाणे आज १२ ऑक्टोबर रोजी तिने होणाऱ्या पतीबरोबरचा फोटो शेअर करून त्याचं नाव जाहीर केलं. अंकिताचा होणारा पती कुणाल भगत आहे. तिने इन्स्टाग्रामवर कोलॅब पोस्ट करत ‘सूर जुळले’ असं कॅप्शन दिलंय. आता कुणाल भगत कोण आहे, काय करतो ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – ‘कोकण हार्टेड गर्ल’ला होणाऱ्या नवऱ्याकडून मिळालं सुंदर Surprise! अंकिता फोटो शेअर करत म्हणाली, “केळवणाला सुरुवात…”

कोण आहे कुणाल भगत, काय करतो?

कुणाल भगत हा प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक व लेखकही आहे. अंकितानेही एकदा बिग बॉसच्या घरात तो संगीत दिग्दर्शक असल्याचं म्हटलं होतं. कुणालने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे. कुणाल करण सावंतबरोबर मिळून काम करतो. “तू चाल पुढं” या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी कुणाल-करणला अवॉर्डही मिळाला होता.

Bigg Boss Marathi 5: अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्याबरोबर ‘या’ मराठी गाण्यात केले काम

अंकिता व कुणालने केलंय एकत्र काम

कुणाल हा कोकणातला आहे. अंकिता आणि कुणाल दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. दोघांनी ‘आनंदवारी’ या गाण्यात एकत्र काम केलं होतं. त्यांचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं. आनंदवारी हे गाणं कसं तयार झालं याचा किस्सा देखील अंकिताने बिग बॉसच्या घरात सांगितला होता. तसेच कुणाल व अंकिता दोघांच्या अकाउंटवर त्यांचे काही फोटो आहेत. कुणालने अंकिताने काढलेले त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, त्याचं क्रेडिट तिला दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता- कुणाल कोकणात करणार लग्न

अंकिता मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे आणि ती लग्नही तिच्या गावीच करणार आहे. अंकिता व कुणाल फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार आहेत. स्वतः अंकितानेच याबाबत सांगितलंय.