Vallari Viraj on her Ideal Actress: अभिनेत्री वल्लरी विराज ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिला या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील तिची लीला ही भूमिका प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस पडली होती. तिच्या अभिनयामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. याबरोबरच तिच्या नृत्याचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते.
“तो प्रोमो पाहताना मी आनंदाने रडले…”
वल्लरी विराजने नुकतीच श्रावण क्वीन सोहळ्याला नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तिने कोणती अभिनेत्री तिची आदर्श आहे, याबद्दल वक्तव्य केले. अभिनेत्रीने महाराष्ट्र टाइम्सशी संवाद साधला. त्यावेळी तिने विविध प्रश्नांची उत्तर दिली.
करिअरमधील टर्निंग पॉइंट कोणता होता? यावर वल्लरी विराज म्हणाली श्रावण क्वीन ही स्पर्धा माझ्या करिअरमधील टर्निंग पॉईंट होती. करिअरमधील अविस्मरणीय क्षण कोणता? यावर अभिनेत्री म्हणाली मला मालिका मिळाली होती. त्याचा पहिला प्रोमो आला होता, तो क्षण माझ्या कायम लक्षात राहिल. मी बहुतेक माझ्या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला चालले होते. मी खूप दमले होते कारण त्या दरम्यान मी खूप शूटिंग करत होते. त्यावेळी नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो आला. तो प्रोमो पाहताना मी आनंदाने रडले होते.
सकारात्मक राहण्यासाठी वल्लरी विराज करते ‘ही’ गोष्ट
कायम सकारात्मक राहण्यासाठी काय करतेस? यावर वल्लरी विराज म्हणाली, “मी जास्त चिंता करत नाही. जास्त तणाव येऊ देत नाही. मी वेळच्या वेळी खाते, वेळेत झोपते. जर कसलाही मला तणाव जाणवत असेल तर मी एकावेळी एक चिंता असं करते.
वल्लरी विराजची आदर्श अभिनेत्री कोण?
सध्या या क्षेत्रात तुझं आदर्श कोण आहे? यावर वल्लरी म्हणाली, “मला प्रियांका चोप्रा मला खूप आवडतात. त्या माझ्या आदर्श आहेत. त्यांनी खूप वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.”
दरम्यान, अभिनयाबरोबरच वल्लरीच्या डान्सचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते. आलापिनी निसळबरोबरचे तिचे डान्स व्हिडीओ लोकप्रिय ठरतात.