‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेला अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप होय. पृथ्वीक प्रतापने आतापर्यंत अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय. पृथ्वीक नावापुढे आडनाव लावत नाही, तो फक्त वडिलांचं नाव लावतो. यामागचं कारण नेमकं काय? याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.

पृथ्वीक प्रतापचं पूर्ण नाव पृथ्वीक प्रताप कांबळे आहे. ‘संपूर्ण स्वराज’ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मी कांबळे आडनाव काढून टाकलं नाही, पण मी कांबळे आडनाव लावत नाही. त्याचं कारण म्हणजे मी जवळपास वर्षभराचा असताना वडिलांना गमावलं. माझे वडील कसे दिसायचे तेही मला आठवत नाही. त्यामुळे आता मी काहीतरी चांगलं करतोय, तेव्हा माझे वडील कोण होते, हे लोकांना माहीत असावं ही माझी जबाबदारी आहे.”

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

पुढे पृथ्वीक म्हणाला, “खरं तर इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना त्याबद्दलही कळतंच. पण दुर्दैवाने माझे बाबा कुठे पोहोचलेच नाही. ते त्यांच्या तिशीत गेले, त्यामुळे मी प्रतापचा मुलगा आहे हे लोकांना कळावं. कारण त्यांनी मला जन्माला घातलंय आणि त्यांचा मी ऋणी आहे. माझ्या कागदपत्रांवर माझं पूर्ण नाव आहे, पण जेव्हा क्रेडिट लिस्टमध्ये नाव येतं तिथे मी पृथ्वीक प्रताप लावतो. कारण लोक तेच नाव जास्त शोधतात.”

हेही वाचा – “मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पृथ्वीक हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय कलाकार आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.