छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. यंदा बिग बॉस मराठीची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. २ ऑक्टोबरपासून सुरु झालेले ‘बिग बॉस’मध्ये अनेक राडे, भांडण, स्पर्धकांमध्ये सतत होणारे वाद पाहायला मिळत आहेत. पण हा कार्यक्रम स्क्रिप्टेड आहे असं अनेकजण बोलताना दिसतात. पण तसं खरंच असतं का याचा खुलासा यशश्री मसुरकर हिने केला आहे.

यशश्री मसुरकर ही पहिल्या दिवसापासून या बिग बॉसच्या घरात चर्चेत होती. तिची मतं, वाद, इतर स्पर्धकांबद्दल केलेली विधानं, तिचा खेळ या सर्व कारणांमुळे प्रेक्षकांचं लक्ष तिने वेधून घेतलं. पण गेल्या आठवड्यात ती या घरातून बाहेर पडावं लागलं. ‘बिग बॉस’मधून बहेर पडल्यावर ती विविध माध्यमांना मुलाखती देत आहे. त्यापैकी एका मुलाखतीत तिने बिग बॉस स्क्रिप्टेड असतं की नाही याचा खुलासा केला आहे.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

आणखी वाचा : ‘दृश्यम २’ पहिल्याच आठवड्यात पोहोचला १०० कोटींजवळ, कमावला ‘इतका’ गल्ला

यशश्रीने ‘सकाळ’ या वृत्तवाहिनीला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला “‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड असतं असं अनेकजण म्हणतात, पण हे खरंच स्क्रिप्टेड असतं का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना तिने ‘बिग बॉस’बद्दलचा हा प्रेक्षकांचा समज दूर केला.

हेही वाचा : “काहीही झालं तरी सत्य…” बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर यशश्री मसुरकरची पहिली पोस्ट

ती म्हणाली, “बिग बॉस अजिबात स्क्रिप्टेड नाही. आपण कसं वागायचं, कसं बोलायचं हे कोणीही आपल्याला सांगू शकतं नाही. बिग बॉससारखा शो स्क्रिप्टेड करायचं ठरवलं तर कठीण आहे…किती लेखक लागतील! आणि मग ते एकसारखं नाही का होणार? ‘बिग बॉस’ हे अजिबात स्क्रिप्टेड नाही. इथे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलता, तुम्हाला जसं वाटतं तेच तुम्ही वागता. ते जर स्क्रिप्टेड असतं तर कोण दुसऱ्यांशी उगाचच का भांडण करेल? मग ते मालिकेसारखं सुंदर वातावरण तयार होईल प्रेमाचं, मैत्रीचं. मग तुम्हाला त्यात भांडणं बघायला नाही मिळणार. त्यामूळे बिग बॉस स्क्रिप्टेड नसतं.” यशश्रीच्या या बोलण्यावरून ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड नसतो हे स्पष्ट झालं आहे.