scorecardresearch

घशाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे ४७ वर्षीय टीव्ही अभिनेत्री, आवाज जाण्याची भीती व्यक्त करत म्हणाली…

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री घशाच्या गंभीर आजाराने त्रस्त

lataa sabarwal dignosed with throat nodules
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री घशाच्या गंभीर आजाराने त्रस्त. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. गेली १४ वर्ष ही मालिक व त्यातील कलाकार प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. या मालिकेतून अक्षरा हे पात्र साकारुन हिना खान घराघरात पोहेचली. अक्षराच्या आईची भूमिका साकारलेली अभिनेत्री लता सबरवाल यांनाही याच मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.

लता सबरवाल यांनी गेल्याच वर्षी छोट्या पडद्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. पोस्ट शेअर करत त्यांनी मालिकाविश्वाला रामराम केला असल्याचं सांगितलं होतं. लता सबरवाल सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांनी दिली आहे. लता सबरवाल या मागील काही काळापासून घशाच्या आजाराने त्रस्त आहेत. योग्य उपचार न झाल्यास आवाजही गमावण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा>> Video: नऊवारी साडी, नखरेल अदा अन्…; ‘चंद्रा’ गाण्यावर थिरकली रश्मिका मंदाना, ‘श्रीवल्ली’च्या ठकसेबाज लावणीचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> “नाटू नाटूला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला” अजय देवगणचं ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये वक्तव्य, म्हणाला…

लता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आजाराबाबत माहिती देत चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. “घशाच्या आजारासाठी मी नुकतीच ENT(कान नाक व घसा) तज्ज्ञांची भेट घेतली. माझ्या घशात गाठ आली आहे. यातून बरे होण्यासाठी मला एक आठवडा आराम करावा लागणार आहे. यासाठी मी औषधे घेत आहे. हा एकमेव उपाय आहे. योग्य काळजी घेतली नाही तर माझा आवाजही जाऊ शकतो”, असं लता यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: “हृदयी वसंत फुलताना…” गाण्यावर सचिन-सुप्रिया यांचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल

लता सबरवाल यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत काळजी व्यक्त केली आहे. अनेक कलाकारांनीही कमेंट करत प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 10:58 IST

संबंधित बातम्या