‘ये है मोहब्बते’ टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका संपून अनेक वर्ष झाली तरी प्रेक्षक आजही या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. या मालिकेतील इशिता भल्ला, रमण भल्ला, रूही, आदित्य, शगुन ही सगळीच पात्रे खूप गाजली. मालिकेतील रुही या पात्राला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले. लहान रुहीची भूमिका रुहानिका धवन व मोठ्या रुहीची भूमिका आदिती भाटिया यांनी साकारली होती. दरम्यान, आता आदिती भाटिया एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

आदिती सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. मात्र, सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. आता आदितीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आदितीने एक नवीन मर्सिडीज कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर या कारचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये आदिती तिच्या कुटुंबीयांबरोबर कार घेण्यासाठी गेल्याचे दिसून येत आहे. कार घेतल्यावर आदितीने तिची पूजाही केली. नवीन कारबरोबरचा व्हिडीओ व फोटो आदितीने सोशल मीडियावर शेअरही केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने नवीन कार असे कॅप्शनही दिले आहे. आदितीने पांढऱ्या रंगाची मर्सिडीज-बेंज ई-क्लास घेतली आहे. या कारची किंमत अंदाजे ७५ ते ८५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- “मी चाललो जामनगरला!” मराठमोळा अभिनेता निघाला गुजरातला? नेटकरी म्हणाले, “अंबानी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिती सध्या काय करते?

आदितीने २०१५ मध्ये ‘टशन-ए-इश्क’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘ये है महोब्बते’मधील तिची भूमिका चांगलीच गाजली. टीव्ही इंडस्ट्रीत चांगले नाव कमावल्यानंतरही आदिती भाटियाने आपल्या करिअरची दिशा बदलली आहे. आता आदिती उत्पादनाच्या जाहिरातींवर लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय ती सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणूनही ओळखली जाते. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यासाठी आदिती लाखो रुपयांची फी घेते.