Shireen Mirza Blessed with Baby Boy: ‘स्टार प्लस’वर एकेकाळी गाजलेली मालिका म्हणजे ‘ये हैं मोहब्बते’. या मालिकेत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी व अभिनेता करण पटेल यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली होती. सहा वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील अभिनेत्रीने आता गुड न्यूज दिली आहे. ती एका गोंडस बाळाची आई झाली आहे.
‘ये हैं मोहब्बते’ या मालिकेत करण पटेलने रमन भल्ला ही भूमिका केली होती. रमनच्या बहिणीची भूमिका करून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिरीन मिर्झा आई झाली आहे. अभिनेत्रीने पती हसन सरताजबरोबर एक सुंदर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
शिरीन व हसन एका गोंडस मुलाचे आई-बाबा झाले आहेत. शिरीनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत पहिल्या बाळाचं स्वागत केल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली. शिरीनच्या या पोस्टवर चाहते तसेच सेलिब्रिटी कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत.
पाहा पोस्ट –
दिव्यांका त्रिपाठी, रश्मी देसाई, कृष्णा मुखर्जी, मुस्कान कटारिया, अशिता धवन, संदीप सिकंद, दिप्ती शर्मा या कलाकारांनी शिरीन व हसन यांचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, शिरीन मिर्झाने हसन सरताजबरोबर साडे तीन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य व मोजकेच मित्र उपस्थित होते. आता लग्नानंतर तीन वर्षांनी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.