भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा नुकतीचं ‘झलक दिखलाजा सीझन ११’च्या रिॲलिटी टेलिव्हिजन शोमध्ये झळकली होती. या स्पर्धेत ती टॉप-५ पर्यंत पोहोचली होती, परंतु विजेतेपद पटकविण्यास हुकली. या स्पर्धेदरम्यान तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. यामागचं कारण म्हणजे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रतीक उतेकरबरोबरचा तिचा व्हायरल फोटो. या फोटोमुळे तिला अनेक हेट कमेंट्सचा सामना करावा लागला. यावर धनश्रीने मौन सोडलं आहे.

धनश्री वर्माचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेट कमेंट्स आणि ट्रोल्सचा तिला आणि तिच्या परिवाराला त्रास सहन करावा लागला. याबाबत सांगताना धनश्री म्हणाली, “माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्यावर कधीच ट्रोल किंवा मीम्सचा परिणाम झाला नाही. अलीकडेच झालेल्या ट्रोलकडे दुर्लक्ष करण्याची आणि ते ट्रोल मस्करीत घेण्याची माझी मानसिकता नक्कीच होती. पण, यावेळी माझ्या कुटुंबावर आणि माझ्या प्रियजनांवर याचा परिणाम झाला आणि त्यामुळेच याचा माझ्यावरही परिणाम झाला.”

धनश्री पुढे म्हणाली, “तुम्हा सर्वांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असल्याने तुम्ही सरळसरळ आमच्याकडे किंवा आमच्या कुटुंबीयांच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. या सगळ्या गोष्टींमुळे मी सोशल मीडियावरून डिटॉक्स घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हा खरंच मी खूप शांत आयुष्य जगत होते.”

हेही वाचा… “माहित नाही ते कुठे आहेत”, वडिलांबद्दल सिद्धार्थ चांदेकरचं विधान; म्हणाला, “त्यांनी कधीच…”

“फक्त तुम्हाला एक विनंती आहे की, जरा संवेदनशील व्हा आणि आमच्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आम्ही सर्व जण तुमच्या मनोरंजनासाठी या माध्यमावर उपलब्ध असतो. म्हणून हे विसरू नका की, जशी तुमच्यासाठी तुमची आई, बहीण, मैत्रीण, पत्नी आहे तशीच मी देखील एक स्त्री आहे. त्यामुळे जे सोशल मीडियावर ट्रोलिंग होतं ते काही बरोबर नाही”, अशा शब्दांत धनश्री स्पष्टच म्हणाली.

हेही वाचा… सारा अली खानने पाहिलाय ‘सैराट’ चित्रपट; रिंकू राजगुरूचा उल्लेख करीत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, धनश्रीबद्दल सांगायचं झालं तर धनश्री वर्मा भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलबरोबर २२ डिसेंबर २०२० रोजी लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर धनश्री अनेकदा चर्चेत आली. ‘दिल जश्न बोले’, ‘बल्ले नी बल्ले’ अशा अनेक म्युजिक व्हिडीओजमध्ये धनश्री रणवीर सिंह आणि अपारशक्ती खुराना अशा कलाकारांबरोबर दिसली होती.