Zee Marathi Kamali & Tarini : झी मराठी वाहिनीवर नुकताच ‘तारिणी’ आणि ‘कमळी’ या दोन मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. महाविद्यालयात ड्रग्ज कोण पुरवतंय याचा शोध घेण्यासाठी तारिणी आणि केदार कमळीच्या कॉलेजमध्ये पोहोचतात असं या विशेष भागात दाखवण्यात आलं. यावेळी कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणी म्हणून कौशिकी खांडेकरला आमंत्रित केलं जातं. तसेच अन्नपूर्णा आजी स्वत: कौशिकीचा सत्कार करतात. मात्र, इथेच एक मोठा प्लॅन युवराज आणि कामिनी यांनी मिळून केलेला असतो.

युवराज आणि कामिनी यांनी सत्काराच्या हारात बॉम्ब लपवून कौशिकाला जीवे मारायचं असा कट रचलेला असतो. मात्र, कमळीला कौशिकीच्या गळ्यातील हारात काहीतरी संशयास्पद वाटतं आणि ती तात्काळ तारिणीला याबद्दल सावध करते. दोघी मिळून लोकांना शांत ठेवत, बॉम्बचं मेकॅनिझम समजून घेत, बॉम्ब निष्क्रिय करण्याची तयारी करतात. तारिणी रंगमंचाच्या मागे उभी राहून माइकवर सगळ्या गोष्टी कमळीला सांगत असते आणि त्यानुसार कमळी हा बॉम्ब निष्क्रिय करते. कारण, तारिणीला तिची एक अंडरकव्हर कॉप ही ओळख सर्वांपासून लपवून ठेवायची असते. तारिणी कमळीच्या मदतीने कौशिकीचा जीव वाचवते.

कमळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विजया बाबरने टीम ‘तारिणी’बरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. विजया नेमकं काय म्हणालीये जाणून घेऊयात…

“तारिणीच्या टीमसह काम करण्याचा अनुभव खूप खास होता. शिवानी सोनारबरोबर (तारिणी) माझी आधीच ओळख होती आणि एका शोदरम्यान आम्ही आधी भेटलो होतो. आता शिवानीबरोबर पुन्हा काम करण्याचा अनुभव खरंच कमाल होता. माझा एक डान्स परफॉर्मन्स सुद्धा या महासंगम एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तो डान्स परफॉर्मन्स मी फक्त एक तासात शिकले आणि शूट केला. मी पहिल्यांदाच इतक्या कमी वेळात डान्स शिकले आणि परफॉर्म केलंय. याचं क्रेडिट माझ्या कोरिओग्राफरला सुद्धा जातं, तिच्यामुळे हे शक्य झालं. ‘तारिणी’ माझ्यासाठी नवीन शैलीची मालिका आहे आणि त्याच्यासाठी शूट करण्याचा अनुभव देखील खूप वेगळा होता. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा कमळी-तारिणीचा महासंगम नक्कीच आवडेल.” असं विजयाने सांगितलं.