Savalyachi Janu Savali Upcoming Twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सावली ही कमी बोलणारी; पण चुकीच्या गोष्टी सर्वांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणारी, माहेरच्या माणसांवर जीवापाड प्रेम कऱणारी, सासरच्या लोकांचा आदर करणारी अशी आहे. ती सर्वांची मने जिंकताना दिसते.

सारंगमुळे सावलीचे आयुष्य थोडे सोपे झाले असले तरी ऐश्वर्या तिला त्रास देण्यासाठी अनेक कट-कारस्थाने करत असते. तिलोत्तमाने सावलीचा कधीही स्वीकार करू नये, तिला अडचणींचा सामना करावा लागला पाहिजे, सावली मेहेंदळेंच्या कुटुंबातून बाहेर गेली पाहिजे, यासाठी ऐश्वर्या सावलीविरुद्ध अनेक गोष्टी करताना दिसते.

आता ऐश्वर्याने ताराला हाताशी धरले आहे. त्यामुळे त्या दोघी मिळून सावलीविरुद्ध कारस्थान करताना दिसतात. आता मात्र तारा किंवा ऐश्वर्यामुळे नाही, तर सारंगचा मोठा भाऊ राजकुमारमुळे मेहेंदळे कुटुंबावर संकट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तिलोत्तमा आणि तिचा मुलगा राजकुमार एका खोलीत आहेत. तिलोत्तमा राजकुमारला सावलीबद्दल म्हणते की ती बाहेरची पोर आहे; पण या घराची इज्जत, अब्रू, लाज त्या पोरीनं राखली. तिलोत्तमाचे बोलणे ऐकल्यानंतर राजकुमार तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की, आई मी काय करू? त्यावर तिलोत्तमा त्याला म्हणते की पश्चात्ताप!

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, राजकुमार रागात आहे. तो एकटा असून एकटाच बोलत आहे. तो म्हणतो की, आज तू मला कायमचं मेहेंदळेंपासून दूर केलंस ना? मग मीसुद्धा आज एक शपथ घेतो. राजकुमार हे बोलत असताना सावली ते बघते. तो काय करतो, हे ती लक्ष देऊन पाहू लागते. पुढे दिसते की राजकुमार काही कागदपत्रे हातात घेऊन म्हणतो, राजकुमार या मेहेंदळे परिवाराला रुपम कॉस्मेटिक्स आणि घरातून कायमचं दूर करेल. त्यानंतर तो हसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राजकुमारचे हे बोलणे ऐकल्यानंतर सावली मनात म्हणते की, राजकुमारसरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? ते नक्की काय करणार असतील? हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, “सावली राजकुमारचा नेमका हेतू जाणू शकेल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

काही दिवसांपूर्वी राजकुमारचे एका मुलीबरोबर अफेअर असल्याचे सावलीने सर्वांसमोर उघड केले होते. तो अमृताला आणि संपूर्ण मेहेंदळे परिवाराला फसवत असल्याचे सावलीने देवाच्या मदतीने सिद्ध केले होते. त्यानंतर तिलोत्तमाने त्याला घराबाहेर काढले होते. मात्र, जग्गू आजीला राजकुमारला भेटायचे असल्याने त्याला पुन्हा घरात घेण्यात आले.

आता मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.