Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. सावली व सारंग त्यांच्या स्वभावाने, त्यांच्या एकमेकांवरील असलेल्या विश्वासाने, प्रेमाने सर्वांची मने जिंकत आहेत.

मेहेंदळेंच्या घरात गोऱ्या रंगाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तिलोत्तमाला सारंगची पत्नी आणि मेहेंदळेंची सून ही श्रीमंताघरची आणि गोरी असणारी पाहिजे होती. मात्र, गरीब घरातील आणि सावळ्या रंगाची सावली सारंगची पत्नी म्हणून मेहेंदळेंच्या घरात आली.

सावलीने तिच्या प्रेमळ आणि मायाळू स्वभावाने सारंगच्या मनात तिची जागा निर्माण केली. त्यांच्यात उत्तम मैत्री झाली. आता सारंग सावलीच्या प्रेमात पडला आहे. तो तिच्यासाठी विविध गोष्टी करताना दिसतो. तो तिच्या घरच्यांचीदेखील अनेकदा काळजी घेताना दिसतो. आता सारंगचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे.

सारंग कावड खांद्यावर घेऊन सावलीच्या आई-वडिलांची वारी पूर्ण करणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली‘ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावलीचे आई-बाबा वारीसाठी निघाले आहेत. तिची आई तिच्या बाबांना विचारते की, या वर्षी आपली वारी चुकेल का? आरोग्याच्या समस्येमुळे वाटेत ते एका ठिकाणी थांबतात.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सावली दिंडी जात असलेल्या ठिकाणी जाते. सावली एका वारकऱ्याला विचारते की, दादा आळंदी गावची दिंडी कुठे आहे? तो वारकरी तिला रस्ता दाखवीत सरळ जा, असे सांगतो. सावली तिच्या आई-वडिलांना शोधत असते. एका महिलेला ती विचारते की, काकू माझे आई-वडील कुठे आहेत? ती महिला म्हणते की माहीत नाही. पण, मागे राहिले वाटतं.

सारंग ज्या गाडीतून जात असतो, ती गाडी बंद पडते. त्यानंतर तो एका व्यक्तीची सायकल घेतो. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सारंग सावलीच्या आई-वडिलांना कावडीमध्ये बसवतो आणि तो त्यांना पंढरीच्या वारीसाठी घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘कावड घेऊनी आपल्या खांद्यावरी, सारंग चुकू द्यायचा ना वारी’, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. “ही खूप चांगली मालिका आहे”, “छान”, “सुंदर”, “वाह! असं काहीतरी संध्याकाळी ७ वाजता बघायला मिळालं की मन प्रसन्न होतं”, “या मालिकेमुळे मी वारकऱ्यांबद्दल वाचलं.”, “अंगावर शहारे आले”, “या वर्षीची वारी सारंग व सावली पूर्ण करणार आहे. हीच विठुरायाची इच्छा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता मालिकेत काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.