Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सारंग व सावली त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात.

मर्जीविरुद्ध लग्न झाल्यामुळे सारंगला सावलीबरोबरचे लग्न स्वीकारण्यास वेळ गेला. पण, कालातरांने त्यांच्यात मैत्री झाली आणि सारंग सावलीच्या प्रेमात पडला. सावलीनेदेखील तिच्या चांगल्या स्वभावामुळे आणि गोड वागण्याने घरातील इतरांची मने जिंकली. सारंगची आई तिलोत्तमा आणि सावली यांच्यात अजूनही अंतर असल्याचे दिसते, कारण सावलीने धोका देऊन सारंगशी लग्न केल्याचे तिचे म्हणणे आहे.

याबरोबरच सावली सावळ्या रंगाची आहे आणि तिलोत्तमाला फक्त गोऱ्या वर्णाची लोकं आवडतात. सावळ्या किंवा काळ्या रंगाची माणसे, वस्तू यांचा तिला तिरस्कार आहे. या सगळ्यात सारंगची वहिनी ऐश्वर्या सतत सावलीविरुद्ध कारस्थान करताना दिसते.

घरात जेव्हा फक्त सावली व तिलोत्तमा दोघीच होत्या, त्यावेळी त्यांच्यातील अंतर कमी व्हावे म्हणून सारंगने कोणीही घरी जाऊ नये, असे सांगितले. पण, ऐश्वर्या गुपचूप घरात आली, तिने सावलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दोन चोर घरात घुसले होते. तर सर्वांसमोर ऐश्वर्याने सावलीनेच हे सर्व घडवून आणल्याचा आरोप केला.

घरात कोणी नाही हे पाहिल्यानंतर सावलीनेच चोरांना बोलावल्याचे तिने म्हटले. याबरोबरच, जेव्हा घरातील सर्व जण देवळात गेले, तेव्हा ते सावलीला घेऊन गेले नाहीत. त्यावेळीसुद्धा ऐश्वर्याने सावलीला तिच्या खोलीत कोंडून ठेवले. याबरोबरच, सारंगला अंधाराची भीती वाटते हे माहीत असूनही ऐश्वर्याने मंदिराच्या परिसरातील लाईट घालवल्याचे पाहायला मिळाले. अशी अनेक कारस्थाने ऐश्वर्या करत असल्याचे पाहायला मिळते. या सगळ्यात आता तिला तारादेखील सामील झाली आहे.

ऐश्वर्या सावलीची माफी मागणार?

आता झी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, ऐश्वर्या तिलोत्तमाला सांगते की भैरवी वझे जेव्हा तुमच्याशी भांडून गेल्या तेव्हा त्या काय म्हणालेल्या? मी तुझ्या मुलाच्या आयुष्यात अंधार केला तर नावाची भैरवी वझे नाही, असे भैरवी म्हणाल्या होत्या. हे ऐकल्यानंतर तिलोत्तमा भैरवीच्या घरी गेल्याचे दिसत आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जगन्नाथ सावलीला फोन करतो आणि तिला विचारतो की तू व्हिडीओ पाहिलास का? त्यावर सावली हो, पण आपण सिद्ध कसं करणार? असे विचारते. त्यावर जगन्नाथ म्हणतो की तुझा शत्रू तुझ्याच घरात लपून बसला आहे, हे सिद्ध कसं करायचं ते मी बघतो, तू काळजी करू नकोस.

प्रोमोमध्ये दिसते की ऐश्वर्या सावलीचे हात हातात घेते, त्यावेळी सारंग म्हणतो की वहिनी हात हातात घेऊन चालणार नाही, तुला सावलीला सॉरी म्हणावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने ऐश्वर्या सावलीला सॉरी म्हणेल का? अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.