झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमधील कलाकारांनाही प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसतात. या मालिकेमध्ये अनामिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिल्पा तुळसकरने तर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या या मालिकेमधुळे ती चर्चेत आहे. शिल्पाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला.

आणखी वाचा – आई-वडिलांच्या लग्नाला ३२ वर्षं पूर्ण होताच लेकाला पडला प्रश्न, आदेश बांदेकरांचा मुलगा म्हणतो, “तुम्हाला बघूनच…”

शिल्पाचा प्रेमविवाह झाला आहे. तिने तिच्या अफेअरबाबत अमृता फिल्म्स या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं. ती म्हणाली, “फिल्म इन्स्टीट्युटची एक डिप्लोमा फिल्म मी केली होती. तेव्हा मी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते. मला महाविद्यालयामधील कोणता मित्र आवडला नाही. पण या क्षेत्रामध्ये खूप कमी लोकांकडे पाहून मला असं वाटलं की यांच्याशी लग्न झालं असतं तर मला आवडलं असतं.”

“फिल्म इन्स्टीट्युटची डिप्लोमा फिल्म जेव्हा मी करत होते तेव्हा तिथला डीओपी मला खूप आवडला होता. त्याने चित्रीकरणादरम्यान लावलेली प्रत्येक फ्रेम छान दिसत होती. त्या फ्रेमध्येच मी होते. मीही सुंदर दिसत होते. एक गोंधळ तेव्हा मी घातला. त्या डीओपीची व माझी छान मैत्री झाली होती.”

आणखी वाचा – “बाजीराव पेशवे छत्रपतींची गादी बळकावू शकले असते पण…” शरद पोंक्षेंनी सांगितला बाजीरावांचा मोठेपणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे शिल्पा म्हणाली, “मला कळलं होतं की त्याला मी आवडत आहे. मलाही तो आवडायचा. पण हे मी त्याला सांगितलं नाही. कारण मला बॉयफ्रेंड होता. मी कोणाला तरी डेट करत आहे हेही मी त्याला सांगितलं नाही. कारण मला ती मैत्री गमवायची नव्हती. पण शेवटी एक वेळ अशी आली की त्यानेच मला प्रपोज केलं. त्यावेळी माझा बॉयफ्रेंड आहे हे मला त्याला सांगावं लागलं. तेव्हा आमची मैत्री तुटली. त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही पुन्हा याच क्षेत्रात काम करत असताना भेटलो. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा खूप गंमतीने या विषयावर बोललो. पण मी त्याचं मन तेव्हा दुखावलं. आजही मला त्या गोष्टीचं दुःख वाटतं.” शिल्पाने अगदी दिलखुलासपणे आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलणं पसंत केलं.