Vin Doghantali Hi Tutena Upcoming Twist: सुबोध भावे व तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. समर व स्वानंदी ही दोन्ही पात्रे प्रेक्षकांना आवडू लागली आहेत.
समर व स्वानंदी दोघांचेही वय जास्त झाले आहे; पण अजूनही त्यांनी लग्न केलेले नाही. दोघांचेही आपापल्या कुटुंबावर प्रेम आहे. विशेषत: समरचे त्याची बहीण अधिरावर आणि स्वानंदीचे तिचा भाऊ रोहनवर प्रेम आहे. असे असले तरी समर व स्वानंदी या दोघांचे स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे पाहायला मिळते. मालिकेत अजून स्वानंदी व समर यांची भेट झाली नसल्याचे दिसत आहे.
समरच्या कंपनीला एका वृद्धाश्रमाची जमीन ताब्यात घ्यायची आहे आणि स्वानंदी त्याला विरोध करत आहे. तर, दुसरीकडे स्वानंदीच्या आईने मुद्दाम पैसे लुटण्याचा प्रयत्न केल्याने समरने तिच्या आई आणि बहिणीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आता झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते, “स्वानंदी समरच्या बंगल्याबाहेर आली आहे. समरचा मित्र तिथे येतो. तो समरच्या कंपनीत कामही करतो. ती त्याला म्हणते की, माझी आई, बहीण व बाबा तिथे कस्टडीमध्ये आहेत. त्यावर समरचा मित्र म्हणतो की, तुम्ही काही बोलूच नका. त्यावर स्वानंदी त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की, मी तुमच्यासमोर हात जोडते. प्लीज तुमच्या सरांशी एकदा बोला. स्वानंदीची विनंती ऐकून तो तिला म्हणतो की. मी एकदा समरसरांशी बोलून बघतो आणि तो बंगल्यात जातो.
बंगल्यात गेल्यानंतर तो समरला समजावून सांगतो की, तू एकदा त्या बाईशी बोल आणि मग ठरव. तितक्यात समरचा लहान भाऊ आयुष्मान तिथे येतो. तो चौकीदाराला सांगतो की, इथून पुढे अनोळखी लोकांना गेटपासून ५०० मीटर लांब उभं करायचं. निघा. आणि तो घरात येऊन सांगतो की, दादा ही तीच मुलगी आहे, जिला आपली जमीन हडप करायची आहे. त्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर समर म्हणतो की, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. आजच्या आज जमीन खाली व्हायला पाहिजे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, समर स्वानंदीशी बोलणार की स्वानंदीला जमीन खाली करावी लागणार?, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. “एक आठवडा झाला तरी नायक-नायिका भेटले नाहीत. नुसता टाइमपास सुरू आहे. एकही सकारात्मक सीन नाही. पहिल्या भागापासून मालिकेत नुसती नकारात्मकता सुरू आहे. या मालिकेकडून खूप अपेक्षा होत्या. पण, सध्या तरी खूपच फालतूपणा सुरू आहे. यापेक्षा तारिणी मालिका चांगली सुरू आहे.”, “दोघं कधी भेटणार”, ” ‘बडे अच्छे लगते हैं’ची जागा कधीच घेऊ शकत नाही.”


“खूपच गैरसमज सुरू आहेत. समर आणि स्वानंदी एकमेकांसमोर येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. समरचा भाऊ त्याला फसवत आहे, हे समजल्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया असणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.”, “ते दोघे एकमेकांसमोर कधी येणार? अजून किती वाट पाहावी लागणार?”, “स्वानंदी हे नाव खूप छान आहे”, “मधुगंधा आणि मुग्धा या मालिकेच्या लेखिकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. या जोडीने याआधी हिट मालिका लिहिल्या आहेत. यावेळीसुद्धा त्या कमाल करतील. इतक्या गैरसमजामुळे मालिकेत पुढे चांगला ट्रॅक येणार आहे. “

दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.