प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री नव्या स्वामीची नुकतीच करोना चाचणी करण्यात आली. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिने मालिकेची शूटिंग ताबडतोब थांबवली. गेल्या तीन-चार दिवसांपासून तिला डोकेदुखीचा त्रास होता. डॉक्टरांनी करोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिल्यानंतर तिने ती चाचणी केली आणि तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर तिला क्वारंटाइन करण्यात आलं असून मालिकेतील इतर कलाकार व क्रू मेंबर्स यांचीही चाचणी करण्यात येत आहे. ‘ना पेरू मीनाक्षी’ आणि ‘आमे कथा’ या तेलुगू मालिकांसाठी नव्या प्रसिद्ध आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नव्या म्हणाली, “काल रात्री घरी गेल्यानंतर आणि सकाळीही मी खूप रडत होते. माझी आईसुद्धा रडत आहे. मला अनेकांचे मेसेज येत आहेत. हे सगळं खूप त्रासदायक आहे. माझ्यामुळे माझे सहकलाकार आणि क्रू मेंबर्स यांचेही प्राण धोक्यात घातल्यामुळे मला अपराधी असल्यासारखं वाटतंय.”
View this post on Instagram
जवळपास तीन महिने सर्व शूटिंग बंद होतं. मात्र आता नियमावली आखत शूटिंगला सुरुवात करण्यात आली. तरीसुद्धा करोनाचा धोका हा कायम आहे. त्यामुळे आता मनोरंजन सृष्टीसमोर हे एक नवं आव्हान आहे.
