मुंबईतील एका महानगर दंडाधिकारी न्यायालयानं टेनिसपटू लिएंडर पेसला एक्स गर्लफ्रेंड आणि मॉडेल रिया पिल्लईच्या कौटुंबीक हिंसाचार प्रकरणात दोषी मानलं आहे. २०१४ साली रिया पिल्लईनं लिएंडर पेसच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. याची सुनावणी करताना न्यायालयानं लिएंडर पेसनं त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला मासिक पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी न्यायालयानं आदेश दिले आहेत की, जर रिया पिल्लईलं वेगळं राहायचं असेल तर लिएंडर पेसनं तिला एक लाख रुपये मासिक पोटगी तसेच घरभाडं म्हणून ५० हजार रुपये प्रतिमहिना द्यावे. महानगर दंडाधिकारी कोमल सिंह राजपूत यांनी फेब्रुवारी २०२२ च्या सुरुवातीला हे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची लेखी कागदपत्र बुधवारी उपलब्ध झाली आहेत.

आणखी वाचा- कथित गर्लफ्रेंड सबा आझादसाठी हृतिक रोशनची पहिली पोस्ट, म्हणाला…

काय आहेत रिया पिल्लईचे आरोप
रिया पिल्लईच्या म्हणण्यानुसार, ती लिएंडर पेससोबत जवळपास ८ वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यानंतर तिने २०१४ मध्ये लिएंडरवर गंभीर आरोप केले होते. लिएंडरनं मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक शोषण केल्याचं रियाचं म्हणणं आहे. त्याच्या वर्तणुकीचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचंही रियानं म्हटलं होतं.

लिएंडरनं केले होते रिया पिल्लईवर आरोप
लिएंडर पेस आणि रिया पिल्लई एकमेकांसोबत ८ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रिया पिल्लई ही अभिनेता संजय दत्तची पूर्वश्रमीची पत्नी आहे. अशात लिएंडर पेसनं रियावर, तिनं अगोदरच विवाहित असल्याचं माझ्यापासून लपवलं असा आरोप केला होता. दरम्यान सध्या लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्माला डेट करत आहे. काही काळापूर्वीच या दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis star leander paes proven guilty of domestic violence against ex partner rhea pillai mrj
First published on: 26-02-2022 at 11:45 IST