Hardik Pandya Viral Video: शेवटचा पर्याय ‘तोच’ असं म्हणत आजवर कित्येकदा सामान्य माणसापासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण कठीण काळात देवाच्या दर्शनाला गेले आहेत. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यावर सुद्धा कदाचित अशीच वेळ आली असावी अशी चर्चा सध्या ऑनलाईन सुरु आहे. याचं निमित्त ठरलं पांड्याचा नवा व्हिडीओ. प्राप्त माहितीनुसार मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या ५ एप्रिलला गुजरातच्या सोमनाथ मंदिरात शिवलिंगावर दुग्धाभिषेक करत प्रार्थना करताना दिसल. हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर अनेकांचा हार्दिकवर असणारा राग या कमेंट्समध्ये दिसत आहे. तर काहींनी ट्रोलर्सला विनंती करून हार्दिकचे चांगले गुण सुद्धा अधोरेखित करण्याचा प्रयत्न कमेंट्स बॉक्स मध्ये केला आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे व त्यावर नेटकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे आपण आता सविस्तर पाहूया..

डिसेंबरमध्ये गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये पांड्याने घरवापसी केली. पांड्या परत आल्याचा आनंद मुंबई इंडियन्सचे चाहते साजरा करत असतानाच अचानक रोहित शर्माच्या जागी कर्णधार म्हणून पांड्या संघात आलाय अशी घोषणा झाली आणि मग कदाचित कुणीच विचार केला नसेल अशा स्तरावर पांड्याचं ट्रोलिंग सुरु झालं. अगदी मैदानात हार्दिक येताच लोकांनी त्याला छपरी म्हणायला, अपशब्द वापरून बाहेर जा म्हणून सांगायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही. अशात हार्दिकचं रोहितला जागा दाखवणं, इतर खेळाडूंचं हार्दिककडे दुर्लक्ष करणं हे ट्रोलर्सना बोलण्याची आणखी संधी देऊ लागलं. गुजरात टायटन्सला पराक्रमी विजय मिळवून देणारा किंबहुना विश्वचषकात आशिया कपमध्ये संघाला कित्येकदा जीवनदान दिलेला पांड्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करताना अनेकदा मैदानात हतबल सुद्धा दिसून आला. या सगळ्या प्रसंगात कदाचित काही क्षण निवांत घालवण्यासाठी आता तो गुजरातच्या सोमनाथ मंदिरात पोहोचला होता.

gurpatwant singh pannun
गुरुपतवंतसिंह पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी निखिल गुप्ता अमेरिकेच्या ताब्यात; प्रत्यार्पणानंतर होणार सुनावणी!
hezbollah fires 200 rockets at Israel after senior commander killed
हेजबोलाचे इस्रायलवर रॉकेट हल्ले; युद्धविरामाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्यानंतरही प्रादेशिक तणाव वाढण्याची भीती
stock market update sensex fell by 33 points to settle at 76456
Stock Market Update : अस्थिरतेच्या हिंदोळ्यात ‘सेन्सेक्स’ सलग दुसऱ्या सत्रात नकारात्मक
Nitin Gadkari not standing for modi
मोदी मोदी नामगजरापासून नितीन गडकरी अलिप्त; सोशल मीडियावर कौतुक, व्हायरल व्हिडीओतील सत्य काय?
Rejection of electricity smart prepaid meters India Aghadi demands to cm eknath shinde to continue connection of existing post paid meters
विजेच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला नकार; सध्याच्या पोस्टपेड मीटर्स जोडण्या चालू ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे इंडिया आघाडीची मागणी
Fifth accused, Haryana,
सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाचव्या आरोपीस हरियाणातून अटक
prajwal revanna
महिन्याभरानंतर भारतात परतलेल्या प्रज्वलला विमानतळावरच अटक, व्हिडिओतील आवाजाचे नमुने गोळा करणार?
Dhruv Rathi
युट्यूबर ध्रुव राठीला जीवे मारण्याची धमकी; एक्स पोस्टवर म्हणाला, “या सगळ्यामागे…”

हे ही वाचा<< IPL 2024 SRH vs CSK Live: शिवम दुबेची तुफान फटकेबाजी सुरू, रहाणेच्या जोडीने चेन्नईची धावसंख्या नेली १०० पार

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत?

हार्दिक पांड्याच्या सोमनाथ दर्शनावर सुद्धा टीका करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काहींनी लिहिलंय की, “यापेक्षा सराव कर, मनी नाही भाव आणि देवा मला पाव करण्याचा उपयोग नाही.” काहींनी लिहिलंय की, तू रोहित शर्माला जेवढं दुःख दिलं आहेस त्यासाठी तुला माफ करणार नाही.” काहींनी लिहिलंय की, “पूजा-अर्चना गुजरात मधील सोमनाथ मंदिरात करायची आणि पैसे जास्त मिळतात म्हणून त्याच गुजरातच्या टीम चा कॅप्टन असून देखील त्या टीमचे नेतृत्व सोडायचं आणि मुंबई (महाराष्ट्र) टीमसाठी गुजरात मध्ये प्रार्थना करायची… काय टिंगल चालवली आहे तेच कळत नाही.”

तुमचं या व्हिडीओवर काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा!