सध्या दक्षिणात्य चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर डंका वाजताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. तर आता या यादीमध्ये थलपथी विजयचा ‘लिओ’  चित्रपट सामील झाला आहे.

सुपरस्टार थलपथी विजयचा बहुचर्चित ‘लिओ’ हा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई करून बाजी मारली. तर आता सर्वात पटकन २०० कोटींहून जास्त कमाई करणारा लिओ हा चित्रपट ठरला आहे.

आणखी वाचा : थलपथी विजयच्या ‘वारिस’ची भारतात दमदार कामगिरी, ५ दिवसांतच पार केला १०० कोटींचा आकडा

पहिल्या दिवशी या चित्रपटाने जागतिक स्तरावर १४८.५ कोटींची कमाई केली. त्यापैकी ६४.८० कोटी या चित्रपटाने भारतात कमावले होते. तर काल म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरातून २१५ कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. तर पहिल्याच दिवशी १४८ कोटींचे कमाई करून या चित्रपटाने रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटालाही मागे टाकलं.

हेही वाचा : थलपथी विजयच्या ‘वारिस’च्या कलेक्शनमध्ये ३ दिवसात दुपटीने वाढ, जगभरातून ‘इतका’ गल्ला जमवत पार केला २०० कोटींचा आकडा

थलपथी विजयची प्रमुख भूमिका असलेला लिओ चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. थलापती विजयच्या व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, त्रिशा कृष्णन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद, मिस्किन, अर्जुन सर्जा आणि गौतम वासुदेव मेनन यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.