दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपथी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विजयचे लाखो चाहते आहे. सध्या विजयच्या ‘बीस्ट’ Beast या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्याच्या स्क्रीन स्पेसवर फरक पडू शकतो, कारण याच काळात बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter 2’ आणि ‘Jersey’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान, आता विजयच्या या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपटावर बंदी आणण्याचे कारण हे त्यात दाखवण्यात आलेल्या इस्लामिक टेररिझम सीन आहे, असे म्हटले जात आहे. यामुळे चित्रपटाच्या रिलीजसमोर अडचणी येऊ शकतात. पण चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली नाही, तर ही बंदी कुवेतमध्ये घालण्यात आली आहे. कुवेत सरकारने हे देशाच्या हिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : एप्रिल फूलचा विनोद पडला महागात, Video शेअर करत अंशुमन विचारेच्या पत्नीने केली ‘ही’ विनंती

आणखी वाचा : सई ताम्हणकरला मिळाला तिचा ‘दौलतराव’? इन्स्टाग्रामवर मिस्ट्री मॅनचा फोटो शेअर करत म्हणाली…

यापूर्वी कुवेतने दिलकीर सलमानच्या ‘कुरूप’ आणि विष्णू विशालच्या ‘एफआयआर’ या चित्रपटावरही बंदी घातली होती. आता कुवेतमधील विजयच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी शेजारील देशांमध्ये जावे लागणार आहे. या चित्रपटांमध्ये पाकिस्तानचा अँगल आणि दहशतवाद दाखवण्यात आला आहे. ज्या चित्रपटांमध्ये अरब देशांत दहशतवाद्यांचे अड्डे दाखवले जातात त्या चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली आहे.

आणखी वाचा : “माझ्या पतीने माझ्या ओळखीच्या सर्व महिलांसोबत…”, अभिनेत्री मंदाना करीमीने केला धक्कादायक खुलासा

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये विजयला दहशतवाद्यांशी लढताना दाखवण्यात आलं आहे. हे पाहून चित्रपटासाठी लोकांची उत्सुकता आणखीनच वाढली. ट्रेलरमध्ये विजय एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसत आहे, जो चेन्नईच्या मॉलमध्ये अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवतो. विजयची ही भूमिका लोकांना खूप आवडली. या चित्रपटात दाखवण्यात आलेली ही दहशतवादी दृश्ये पाहून कुवेतमध्ये त्यावर बंदी घालण्याची चर्चा आहे. चित्रपटसृष्टीतील ट्रॅकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोबाला विजयबालन यांनीही याप्रकरणी ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, “कुवेत सरकारने विजयच्या ‘बीस्टवर बंदी घातली.” दरम्यान हा चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.