९५ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२३ च्या नामांकनांची घोषणा आज करण्यात आली. ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ हे गाणं आता बेस्ट ओरिजनल सॉंग या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झालं आहे. तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्टफिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्सच्या’ बरोबरीने Haulout, How do you measure a year?, The Martha Mitchell Effect आणि Stranger At The Gate या डॉक्युमेंट्री शर्यतीत आहेत.

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही डॉक्युमेंट्री कथानक तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाचे दर्शन घडवते ज्यात ते दोन बेबंद हत्ती यांना दत्तक घेतात आणि त्यांचे संगोपन कसे करतात यावर ही बेतलेली आहे. ऑस्कर विजेते गुनीत मोंगा यांनी डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली आहे. कार्तिकी गोन्साल्विस यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. एकूण ४१ मिनिटांची ही डॉक्युमेंट्री आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९५ व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकनं २४ जानेवारी रोजी घोषित केली जातील, तर ऑस्कर सोहळा १२ मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाईल. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जिमी किमेल करणार आहेत.