सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा आहे ती सैराट या चित्रपटाची. या चित्रपटातील गाण्यांनी तर सगळ्यांनाच याड लावून टाकलंय. सर्वत्र सैराटमय वातावरण आपल्याला पाहावयास मिळत आहे.
सिने कलाकारांसह अनेकांनी सैराट या चित्रपटाचे कौतुक केले. इतकेच नाही तर या चित्रपटातील गाण्यावर मराठी कलाकारांनी ठेका घेतलेला व्हिडिओही आपण काही दिवसांपूर्वी पाहिला. या चित्रपटातील गाण्याचे वेड आता द ग्रेट खलीलाही लागले आहे. द ग्रेट खलीने सैराट चित्रपटाचं गाण पाहिलं आणि त्यालाही ते आवडंल याचा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय. यात खलीने आपल्याला सैराट चित्रपटातील गाणं आवडलं असल्याचं म्हटलंय. खली म्हणाला की, मला भाषा समजली नाही. पण मला त्याचं संगीत खूप आवडलं.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: ‘सैराट’च्या गाण्याची खलीलाही भुरळ
चित्रपटातील गाण्याचे वेड आता द ग्रेट खलीलाही लागले आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 02-05-2016 at 12:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The great khali like sairat movie song