काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा आणि अक्षय कुमार यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा होताना दिसत होत्या. एवढंच नाही तर अक्षय कुमारनं कपिल शर्मा शोमध्ये येण्यासही नकार दिला असं बोललं जात होतं. त्यानंतर आता अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो कपिल शर्माला ‘बेवफा’ म्हणताना दिसतोय. वादाच्या चर्चांनंतर अक्षय कुमारचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

अक्षय कुमारनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत कपिल शर्मा देखील आहे. हा व्हिडीओ देखील कपिल शर्मा शोच्या सेटवरील असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला अक्षय कुमार कपिल शर्मावर आपली सर्व नाराजी व्यक्त करताना दिसत आहे आणि यातच तो कपिल शर्मा ‘बेवफा’ आहे असंही म्हणताना दिसतोय. पण याचं कारण मात्र खूप वेगळं आहे.

आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

अक्षय कुमारनं त्याचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर आता अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्रामवर कपिलसोबतचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या चित्रपटाचं गाणं ‘सारे बोलो बेवफा’चं प्रमोशन करताना दिसत आहे. यावेळी अक्षय म्हणतो, ‘बेवफा म्हणजे विश्वासघात करणारा. अशी व्यक्ती सर्वांच्या आयुष्यात असते. माझ्या आयुष्यातही आहे आणि तो आहे कपिल शर्मा.’ यावर कपिलला देखील हसू आवरणं कठीण होतं.

आणखी वाचा- ‘घरात होतो मुला- मुलींमध्ये भेदभाव’ लेकीच्या वक्तव्यावर श्वेता बच्चनचं स्पष्टीकरण, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार कपिल शर्मा शोमध्ये ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनसाठी येणार नाही अशी चर्चा होती. दोघांमध्ये काही वाद झाल्यानं अक्षयनं असा निर्णय घेतल्याचंही बोललं गेलं होतं. मात्र त्यावेळी कपिलनं यावर स्पष्टीकरण देत काही गैरसमज असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता अक्षयनं कपिलच्या शोमध्ये हजेरी लावल्यानं या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचं दिसून येत आहे.