बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. हा चित्रपटाचे अनेक प्रेक्षक फार कौतुक करत असल्याचे दिसत आहे. मात्र IMDb वर द काश्मीर फाईल्स रेटींगबाबत लोकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यापूर्वी IMDb ने या चित्रपटाला १० पैकी १० रेटींग दिले होते. मात्र आता IMDb या रेटींगमध्ये घसरण करत ८.३ रेटींग दिले आहेत. यामुळे अनेकजण संताप व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला सर्वसामान्यांकडूनच नव्हे तर चित्रपट कलाकारांकडूनही खूप प्रशंसा मिळाली आहे. मात्र आता आयएमडीबीचे रेटिंग घटल्याने चाहते अस्वस्थ झाले आहेत. एका युजरने चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ट्विटरवर टॅग करत याबाबत सांगितले आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

एका सोशल मीडिया युजरने ट्विट करत म्हटले की, The Kashmir Files या चित्रपटाची IMDb रेटिंग यंत्रणेने घटवली आहे. IMDb रेटिंग यंत्रणेनुसार या रेटींग प्रणालीची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी त्यासोबत पर्यायी मोजणी यंत्रणा लागू करण्यात आली आहे. त्यानुसार IMDb या रेटींगमध्ये घसरण करत त्याला ८.३ रेटींग दिले आहेत. याबाबत विवेक अग्निहोत्रीने नाराजी व्यक्त केली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनीही या पोस्टवर नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. ‘हे असामान्य आणि अनैतिक आहे’ असे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेक युजर्स संताप व्यक्त करत आहेत.

ललित प्रभाकरने शेअर केला शर्टलेस फोटो, म्हणाला “प्रश्न पोटा पाण्याचा…”

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.