आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर एक वेगळी छाप उमटवणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक म्हणजे सचिन पिळगावकर. सचिन यांच्या प्रमाणेच त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या दोघांच्या पावलावर पाऊन ठेवून त्यांची मुलगी श्रिया पिळगावरदेखील स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे.
श्रियाने ‘एकुलती एक’ या चित्रपटातून तिच्या अभिनयाच्या दुनियेना सुरुवात केली. या चित्रपटात श्रियाने तिच्या वडिलांसोबत स्क्रिन शेअर केली. त्यानंतर तिने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. तसेच तिने एका फ्रेंच सिनेमामध्ये देखील काम केले. नुकताच श्रियाने एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. दरम्यान तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वोग ब्युटी अवॉर्ड्स २०१९ ला हजेरी लावली. सारा अली खान, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, मलायका अरोरा आणि इतर अभिनेत्रींनी ग्लॅमरस अंदाजात रेड कार्पेटवर जलवा दाखवला. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे श्रिया पिळगावकरने. तिने या अवॉर्ड शोला लॉंग गाऊन घातला होता. तिच्या या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांच्या मनावर राज्य केले. तिने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत वोगच्या रेडकार्पेटवर एण्ट्री केली. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिची तुलना दीपिका पदुकोणशी केली आहे. तसेच अनेकांनी दीपिका आणि सारालाही सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकले आहे असे म्हटले आहे.