रेल्वे स्थानकांवर गाणे गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांचा सोशल मीडियावर गाणं गाताना व्हिडीओ व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाल्या. हा व्हिडीओपाहून बॉलिवूड अभिनेता व गायक हिमेश रेशमीयाने त्याचा आगमी ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ चित्रपटात रानू यांना पहिले गाणे गाण्याची संधी. रानू यांचे पहिले गाणे ‘तेरी मेरी कहानी’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या गाण्याने धूमाकुळ घातला. आता रानू यांच्यासोबत काम करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेकजण उत्सुक आहेत. यामध्ये बॉलिवूड सिंगर कुमार सानू यांनी पहिला नंबर लावला आहे.

एका अल्बम लाँच कार्यक्रमात कुमार सानू यांना रानू मंडल बाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी रानूचे कौतुक करत ‘बॉलिवूड इंडस्ट्रिमध्ये कोणी नवा गायक एण्ट्री करत असेल तर आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. जर रानू यांनी चांगले काम केले तर त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की स्वीकारेन. हिमेशने त्याच्या चित्रपटात रानू यांना गाण्याची संधी दिल्याचे मी ऐकले. मात्र त्यांचे गाणे मी अद्याप ऐकले नाही. पुढे त्या कशा काम करतात हे पाहूया’ असे म्हणाले.

रानू यांची एका गाण्यातूनच बॉलिवूडमध्ये वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच या गाण्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावरही जादू केली. ‘तेरी मेरी कहानी’ गाणे सुपरहिट झाल्यानंतर रानू पुन्हा त्यांचे आगमी गाणे, ‘आदत’ने लोकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी जोरदार तयारी करत होत्या. या गाण्याचा ट्रॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : प्रदर्शनापूर्वीच रानू मंडल यांच्या दुसऱ्या गाण्याचा सोशल मिडियावर धुमाकूळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आदत’ या गाण्यानंतर रानू मंडल हिमेशचे ‘आशिकी में तेरी..’ हे गाणे गाणार आहेत. यापूर्वी रानू यांचे ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळाले होते. रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणणाऱ्या रानू यांचे व्हायरल झालेले गाणे ऐकून हिमेशने त्यांना त्याच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आणि रानू रातोरात स्टार झाल्या. या पहिल्या गाण्यासाठी हिमेशने रानू यांना जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे मानधन दिले आहे.