भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटला की या दोन्ही देशांमध्ये जोशाचे वातावरण असते. गेल्या शनिवारी झालेल्या ट्वेन्टी २० सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर भारतात जणू दिवाळीच साजरी केली गेली. सगळीकडे ढोल-ताश्यांचा आवाज घुमत होता आणि फटाकेही फोडले गेले. मात्र, आपल्या पारंपारिक प्रतिस्पर्ध्याने पुन्हा एकदा आपल्याला धोबीपछाड केल्याने पाकिस्तानी जनता नाराज झाली होती. पण पाकिस्तानी संघाच्या पराभवाचा सर्वात मोठा धक्का बसला तो तेथील कंदिल बलोच या मॉडेलला.
भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा कंदिलने केली होती. पण तिचे हे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. त्यामुळे कंदील बलोचने पाकिस्तानी खेळाडूंवर संतप्त होत एका व्हिडीओद्वारे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज तिने भारतीय खेळाडू विराट कोहलीसाठी एक ट्विट केलेय. त्यात तिने विराटचा उल्लेख विराट बेबी असा करत म्हटले की, विराट बेबी अनुष्का शर्मा ही क्यु?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This model actress just expressed her love for virat kohli
First published on: 22-03-2016 at 13:30 IST