अंमलबजावणी संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. सुकेशने जॅकलिनला कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे तपासात समोर आले होते. यानंतर आता सुकेशने जॅकलिनला प्रपोजही केल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला प्रपोज केले होते. यावेळी त्याने तिला हिऱ्याची अंगठी दिली होती. या हिऱ्याच्या अंगठीवर J आणि S असे लिहिले होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचेही उघड झाले आहे.

सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. तसेच सुकेशने जॅकलिनला गुच्ची जिम वेअर, गुच्ची शूज, रोलॅक्स घड्याळ, १५ जोड कानातले, ५ बिर्किन बॅग, हर्म्स बांगड्या आणि एली बॅग यांसारखे महागडे गिफ्ट्स दिले होते.

याशिवाय सुकेशने जॅकलिनला मिनी कूपर कारही भेट म्हणून दिली. विशेष म्हणजे सुकेशने जॅकलिनच्या आईला १ लाख ८० हजार डॉलरची पोर्श कारही भेट म्हणून दिली होती. त्यासोबतच सुकेशने जॅकलिनच्या बँक अकाऊंटमध्ये १.८० लाख डॉलर ट्रान्सफर केले होते. तसेच मी जॅकलिनची आई गेराल्डिन यांना BMW X5 देखील भेट म्हणून दिली, असा दावा त्याने चौकशीदरम्यान केला होता.

“आजही ते शब्द आठवल्यावर माझ्या अंगावर काटा येतो”, श्रीदेवी यांच्या आठवणीत आलिया भट्ट झाली भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरला ती कशी भेटली याबाबतचा खुलासा केला होता. ती सुकेश चंद्रशेखरला कशी भेटली याबाबतही तिने उघडपणे सांगितले होती. जॅकलिनने सुकेशला फेब्रुवारी २०१७ पासून ओळखत असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये अटक झाल्यानंतर ती कधीही त्याला भेटली नाही, असेही तिने म्हटले होते.