रवि जाधवच्या ‘टाइमपास’ चित्रपटाने तिकीट बारीवर चांगलाच गल्ला कमवला होता. या चित्रपटाच्या यशानंतर आता त्याच्या सर्व चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती ‘टाइमपास २’ची. रवि जाधवने ‘टाइमपास २’चा पोस्टर नुकताच फेसबुकवर पोस्ट केला आहे. ‘टाइमपास २’ हा पुढच्यावर्षी नववर्षाचे स्वागत करणार असून हा चित्रपट २ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी रविने फेसबुकवरूनचं त्याच्या चाहत्यांना दिली होती.
सध्या रविचे या चित्रपटावर जोरदार काम सुरु असून, ‘टाइमपास २’ म्हणून एक फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. या पेजला आत्तापर्यंत पाच हजारांवर लाइक्स मिळाले आहेत.
A True Love Story Never Ends… pic.twitter.com/sXkgHisGk8
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— TP2 (@TP2official) September 13, 2014