मनोरंजनाची खमंग मेजवानी असलेला टाइमपास-३ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागाने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. त्यानंतर आता लवकरच ‘टाईमपास -३’ ची टीम प्रेक्षकांना पोटभर हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. चाहत्यांचा आवडता दगडू तोच असला तरी या भागात प्रेक्षकांना यात एक नवी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. टाइमपास ३ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘टाइमपास 3’ या चित्रपटाचा लेखक प्रियदर्शन जाधव याने अभिनेता प्रथमेश परबसाठी एक खास पोस्ट केली आहे.

प्रथमेश परबने टाइमपास या चित्रपटाच्या तिन्ही भागात काम केले आहे. या चित्रपटाच्या कथेचे लेखन प्रियदर्शन जाधवने केले आहे. यानिमित्ताने प्रियदर्शन जाधवने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात पोस्टमध्ये त्याने प्रथमेशसोबतचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने त्याला एक खास कॅप्शनही दिले आहे.

प्रियदर्शन जाधवची इन्स्टाग्राम पोस्ट

“प्रिय प्रथमेश परब, उद्या Tp3 प्रदर्शित होईल, आणि सुपरहिट सुद्धा होईल !

तुला खूप खूप शुभेच्छा ! केवळ आणि केवळ आणि केवळ तुझ्या प्रेमापोटी ( फोटो पुरावा आहे ) मी टाइमपास ३ लिहिला ! नाहीतर मी काही लिहीत नसतो, हे तू लक्षात घे आणि “हेतू” ही लक्षात घे ! हल्ली सगळं सिरियसली घेणारा मी, टाइमपास करत लिहित नसतो ! खूप खूप यशस्वी हो !

मराठीतल्या ब्लॉकबस्टरची मोठ्या पडद्यावर होणार जबराट एंट्री ! ४०० स्क्रिन्स आणि १०,००० शोजसह टाइमपास ३ २९ जुलैपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला,” असे प्रियदर्शन जाधव याने म्हटले आहे.

दरम्यान ‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणी एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज शुक्रवारी २९ जुलैला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे. याद्वारे प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.