‘टायटॅनिक’ चित्रपट प्रदर्शित होऊन २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेट यांच्या मुख्य भूमिका होत्या. काहींना या चित्रपटात दाखवलेली प्रेमकहाणी आवडते तर काहींना यातील हृदय पिळवटून टाकणारा शेवट आवडतो. या चित्रपटात रोजचा जीव ज्या दरवाजामुळे वाचला, त्याचा लिलाव करण्यात आला आहे.

‘हॉलिवूड रिपोर्टर’ने दिलेल्या वृत्तानुसार, टायटॅनिक जहाजाचा अपघात झाल्यानंतर ज्या दरवाजाने रोजचा जीव वाचवला, तो दरवाजा लिलावात ७१८,७५० डॉलर्समध्ये विकला गेला आहे. यासोबतच केट विन्सलेटने परिधान केलेला ड्रेसही या लिलावात १,२५,००० डॉलर्सना विकला गेला आहे.

“नथुराम गोडसे सादर करताना तो महात्मा गांधींचं वचन…”, संजय मोनेंनी शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ पोस्टवर केलेली कमेंट चर्चेत

लिलाव झालेला दरवाजा (फोटो – स्क्रीनशॉट)

चित्रपट पाहताना लोकांना वाटलं होतं की तो दरवाजा फक्त एक लाकडी पॅनल आहे, पण हेरिटेज ऑक्शन्स ट्रेझरच्या माहितीनुसार तो जहाजाच्या फर्स्ट क्लास लाउंजच्या प्रवेशाद्वारावरील वरच्या फ्रेमचा एक भाग होता. या चित्रपटात केटने परिधान केलेला शिफॉन ड्रेसचा १२५,००० डॉलर्समध्ये लिलाव झाला आहे.

लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

लिलाव झालेल्या दरवाजाबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. चित्रपटाच्या शेवटी जॅकचा मृत्यू होतो, तर रोज या दरवाजाच्या मदतीने वाचते. त्यामुळे जॅकचा जीव वाचू शकला असता असं चाहते म्हणायचे. नंतर चित्रपटात जॅकचा मृत्यू का दाखवला याबाबत दिग्दर्शकाला आपली बाजू मांडावी लागली होती.