‘तू तेव्हा तशी’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती ठरली. हि मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सौरभच्या मनातील भावना तो अनामिकासमोर व्यक्त करू शकेल का? कॉलेजचं रियुनियन त्यासाठी निर्णायक ठरणार आहे. मालिकेत या रियुनियनची सध्या जोरदार तयारी चालू असल्याचं प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळतेय.

मालिकेत सौरभ अनामिकाला अजुन काही क्लू देतो. अनामिका काही त्या मुलीला ओळखु शकत नाही. सौरभ या सगळ्याचा आनंद घेत आहे. प्रेक्षक मालिकेत आता पुढे पाहू शकतील कि रियुनियनचा दिवस येतो. सगळे मित्र अनेक वर्षांनंतर भेटतात. प्रत्येक मुलीमध्ये अनामिका तिला शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिला यश मिळत नाही.

Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

इकडे वल्ली या रियुनियनला पोहोचते आणि सौरभ अनामिकासमोर त्याच्या मनातील गोष्ट बोलु नये यासाठी तिचे प्रयत्न सुरू होतात. ती सौरभला गुंगीचं औषध देते. त्या औषधाचा परिणाम काही काळ राहतो पण सौरभ अनामिका समोर त्याच्या मनातील भावना बोलुन दाखवतो. ती मुलगी अनामिकाच आहे हे अनामिकाला कळणार आहे पण अनामिका सौरभच्या भावनांचा स्वीकार करेल का? हे पाहणं रंजक ठरेल.