‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र रिलीजपूर्वीच तो वादात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अजय देवगणही आहे. मात्र गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून आता याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आहे, असे गंगूबाई यांच्या कुटुंबियांच्या वकिलांनी म्हटले आहे. समाजासाठी इतकं काम करणाऱ्या महिलेला वेश्या म्हणून दाखवलं आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज तकच्या वृत्तानुसार, गंगूबाईंनी चार मुले दत्तक घेतली होती. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या २० झाली आहे. इतकी वर्षे आपल्या आयुष्यात व्यग्र असलेल्या या कुटुंबाचा त्रास चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर वाढला. आपल्या आईवर कोणते पुस्तक लिहिले आहे हेही त्यांच्या मुलांना माहीत नव्हते. त्यांच्या मुलाने आई (गंगूबाई) आणि कुटुंबाची अब्रु वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

गंगूबाई यांच्या कुटुंबीयांचे वकील नरेंद्र म्हणाले की, “ट्रेलर रिलीज झाल्यापासून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. गंगूबाईंची प्रतिमा ज्या पद्धतीने मांडली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या महिलेला वेश्या म्हणून दाखवत आहात, हे कोणत्या कुटुंबाला आवडेल? तुम्ही त्यांना लेडी माफिया डॉन बनवले आहे.”

 “जेंव्हा घरच्यांना कळले की गंगूबाईच्या जीवनावर चित्रपट बनत आहे, तेव्हा ते लपून बसले आहेत. ते घर बदलून अंधेरी किंवा बोरिवलीला जात आहेत. या चित्रपटात गंगूबाईंचे चित्रण ज्याप्रकारे करण्यात आले आहे, ते पाहता गंगूबाई खरोखरच वेश्या होत्या का, त्या समाजसेविका होत्या का, असा प्रश्न अनेक नातेवाईक विचारत आहेत,” असे वकिलाने पुढे सांगितले.

गंगूबाई यांचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह यांनीही २०२१ मध्ये या चित्रपटाबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि निर्मात्यांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. आजतकसोबत बोलताना बाबू रावजी शाह म्हणाले, “माझ्या आईला वेश्या बनवण्यात आले आहे. आता लोक विनाकारण माझ्या आईबद्दल बोलत आहेत. आम्ही संजय लीला भन्साळी आणि हुसैन झैदी यांना नोटिसा पाठवल्या आहेत पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.”

गंगूबाईंची नात भारती म्हणाली की, निर्माते पैशासाठी त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत, हे मान्य नाही. चित्रपटासाठी कुटुंबाची संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर पुस्तक लिहिण्यासाठी त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turned my mother into a prostitute gangubai son on gangubai kathiawadi movie abn
First published on: 15-02-2022 at 22:50 IST