चित्रपट असो किंवा टीव्ही… रुपेरी पडद्यावर स्टार्समधील जे इंटिमेट सीन्स दाखवले जातात, ते चित्रित करताना त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे फक्त अभिनेते आणि अभिनेत्रींनाच माहिती असते.
कधीकधी स्टार्स एकमेकांना आरामदायी वाटण्यात यशस्वी होतात, परंतु कधीकधी सेटवर एक विचित्र वातावरण तयार होते. कनिका मानबरोबरही असेच काहीसे घडले.
‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’मधील अभिनेत्री कनिका मानने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या इंटिमेट सीन्सबद्दल बोलली. तिने सांगितले की, एकदा ती इंटिमेट सीन करण्यापूर्वी इतकी घाबरली होती आणि रडली होती की तिचा सहकलाकार लाजेने सेटवरून निघून गेला होता.
अर्जुन बिजलानी-कनिका मानचा किसिंग सीन
कनिका मानने २०२२ मध्ये अर्जुन बिजलानीबरोबर ‘रूहानियत’ या वेब सीरिजमध्ये काम केले होते, ज्यामध्ये तिच्या किस सीनची खूप चर्चा झाली होती. आता फिल्मीज्ञानशी झालेल्या संभाषणात कनिकाने खुलासा केला आहे की, अर्जुनबरोबर एका इंटिमेट सीनचे शूटिंग करताना ती रडू लागली होती.
कनिका मान म्हणाली, “तो सीन करताना मी रडू लागले. मला कम्फर्टेबल वाटत नव्हते. सेटवर खूप लोक असतात. हो, असे सीन शूटिंग करताना लोकांची संख्या कमी करतात, तरीही ते विचित्र वाटत होते आणि मी रडू लागले. मी त्यांना म्हणाले, “याला सोडून देऊ आपण.”
शूटिंगदरम्यान, अर्जुन बिजलानी कनिका मानच्या वागण्याने इतका लाजला की तो सेट सोडून गेला. त्याला वाटले की कनिका त्याच्यामुळे घाबरली आहे. याबद्दल कनिका म्हणाली, “अर्जुनला काहीतरी विचित्र वाटले, त्याला वाटले की त्याने मला अस्वस्थ केले.”
ती पुढे म्हणाली, “तो सेट सोडून गेला. मी त्याची माफी मागितली. तो माझा सीनियर आहे. त्याने मला खूप काही शिकवले आहे. मी त्याचा खूप आदर करते. मी त्याची माफी मागितली आणि आम्ही तो सीन आरामात केला.”
टीव्हीवर सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून चर्चेत आलेली अभिनेत्री कनिका मान खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. ‘बढ़ो बहू’, ‘चाँद जलने लगा’ आणि ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’सारख्या टीव्ही मालिकांमधून लोकप्रियता मिळवल्यानंतर कनिका मानने वेब सीरिजमध्ये काम केले.
‘रूहानियत’ या वेब सीरिजमध्ये अर्जुन बिजलानीबरोबरची तिची जोडी खूप गाजली. या वेब सीरिजचा पहिला सीझन २०२२ मध्ये प्राइम व्हिडीओवर आला. या सीरिजमध्ये अर्जुन आणि कनिका यांच्यात अनेक इंटिमेट सीन्स होते.