‘भीम भीम भीम.. छोटा भीम छोटा भीम..’ ही टय़ून लागली आणि गोंडस छोटा भीम पडद्यावर लुटुलुटु धावायला लागला की हल्लीची तमाम चिंटू- पिंटू- गुल्लू- टिल्लू- सोनू- मोनू- पिंकी- सोनी- मिनी टीम टीव्हीला नजर खिळवून बसते. त्यांच्या उच्छादाला कंटाळलेल्या आया-आज्याही छोटा भीमवर मनापासून प्रेम करतात, ते खरं तर छोटा भीम आहेच तेवढा गोंडस म्हणून नव्हे तर घरातल्या बच्चेकंपनीला तो तासभर तरी एका जागी शांत बसवून ठेवतो म्हणून. बच्चेकंपनीसाठी छोटा भीम म्हणजे ढोलकपूरचा हिरो! चुटकी, राजू आणि जग्गूचा जिगरी दोस्त! लहान मुलांबरोबरच सध्या छोटा भीम नेटकऱ्यांच्याही चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांने त्याची बालपणापासूनची मैत्रिण असणाऱ्या चुटकीऐवजी इंदुमतीबरोबर लग्न करण्यासंदर्भातील चर्चा इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छोटा भीम सध्या ट्विटवर चर्चेचा विषय आहे कारण लग्नाची उडालेली अफवा. होय छोटा भीम लग्न करतोय अशी अफवा सध्या ढोलकपूरमध्ये नाही तर ट्विटवर पसरली आहे. मात्र तो त्याची लहनपणापासूनची मैत्रीण म्हणजेच बीएफएफ अर्थात बेस्ट फ्रेण्ड असणाऱ्या चुटकी विवाह करणार नसून त्याने आपली आयुष्याची जोडीदार म्हणून ढोलकपूरची राजकुमारी इंदुमतीची निवड केल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. मात्र छोटा भीमने हा निर्णय घेतला आहे की नाही हे पक्क नसलं तरी या निर्णयावर नेटकरी चांगलेच संतापले असून त्यांनी #JusticeForChutki म्हणत चुटकीला न्याय मिळालाच पाहिजे असा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. अनेकांनी छोटा भीमने मोठी चूक केल्याचे म्हणत आपली प्रतिक्रिया या हॅशटॅगच्या मदतीने व्यक्त केलीय. पाहुयात काय आहे ट्विपल्सचे म्हणणे…

असं नसतं प्रेम

 

तिच्या पैशांनी लाडू खाल्ले आणि आता…

हे तर असं झालं

तिला गरज नाही

हे दृश्य पाहून

सगळे पुरुष सारखेच

आता पैसेच पैसे

मग एवढा दिवस चुटकीबरोबर का घालवलेस?

 

ते दोघे एकमेकांसाठी बनले आहेत…

तुलना केल्यास

एक काम कर

 

का असं वागलास?

त्यांनी एकत्रच असायला हवं

छोटा भीमची निर्मिती करणाऱ्या ग्रीन गोल्ड अ‍ॅनिमेशन प्रायव्हेट लिमीटेडने हे छोटा भीमच्या लग्नाचं प्रकरण व्हायरल झाल्यानंतर एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये कंपनीने “या मालिकेतील सर्व पात्र म्हणजेच छोटा भीम, इंदुमती आणि चुटकी ही लहान मुलेच आहेत. छोटा भीमच्या लग्नाची इंटरनेटवर होणार चर्चा खोटी आणि अर्थहीन आहे. आपल्या या लहान बच्चे मंडळींना लहानच राहू द्या आणि त्यांच्या निरागस जीवनाला आणि कथेला प्रेम आणि लग्नासारख्या गोष्टींपासून लांब ठेवूयात,” असं म्हटलं आहे.

एकंदरित हा ट्रेण्ड पाहिल्यास नेटकऱ्यांनी छोटा भीमचं इंदुमतीशी न झालेलं लग्न फारच गांभीर्याने घेतल्याचे चित्र दिसत आहे. ही चर्चा एवढ्या गांभीर्याने झालीय की कार्यक्रमाची निर्मीत करणाऱ्या कंपनीला थेट स्पष्टीकरण देत ही अफवाच असल्याचं सांगावं लागलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter calls justice for chutki as rumour goes viral that chhota bheem marries rani indumati scsg
First published on: 05-06-2020 at 10:31 IST