पॉप संगीताचा बादशाह मायकल जॅक्सनची अद्याप न ऐकली गेलेली गाणी प्रसिद्ध करण्याची योजना असल्याचे मायकल जॅक्सनचा माजी सहयोगी फ्रेड जेरकिन्स तृतीयने  म्हटले आहे. मायकल जॅक्सनच्या संगीताचा आणि व्हिडिओ फुटेजचा अल्बम बनविण्याचे काम सुरू असल्याचा दावा या अमेरिकन निर्मात्याने केला असल्याचे ‘कॉन्टेक्टम्युझिक’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मायकल जॅक्सनची प्रसिद्ध न झालेली अनेक गाणी आणि त्याचे सर्व प्रकारचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे असून, या सर्व गाण्यांचा एकत्रित अल्बम बनविण्याचे काम सुरू असल्याचे जेरकिन्स म्हणाला. तो पुढे म्हणाला, मायकलबरोबर मी दोन वर्षे काम केले. माझ्या कारकीर्दीतला हा सर्वात लक्षवेधी काळ होता. आमच्यात एक सशक्त नातेसंबंधाचा धागा निर्माण झाला होता आणि आम्ही एकमेकांचे जीवाभावाचे मित्र झालो. मजा करणारा आणि तीन चाकी स्कुटर चालवणारा मायकल मला आजही आठवतो. जेरकिन्स आपला भाऊ रॉडनीबरोबर ‘डार्कचाईल्ड’ या टोपण नावाने संगीताची निर्मिती करतो. २००९ मध्ये मायकल जॅक्सनचा औषधाचा ओव्हरडोस झाल्यामुळे मृत्यू  झाला