‘मार्को’ या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटातून चर्चेत आलेला उन्नी मुकुंदन नुकत्याच एका वर्तनामुळे चर्चेत आला. अभिनेत्याच्या माजी मॅनेजरने अभिनेत्यावर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला आणि कोचीमध्ये अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली. उन्नी मुकुंदनचा माजी मॅनेजर विपिन कुमारने आरोप केला आहे की, उन्नी मुकुंदनने त्याला पार्किंगमध्ये बोलावून मारहाण केली. तसंच अपशब्दही वापरले.विपिनने सांगितलं की, फेसबुकवर दुसऱ्या अभिनेत्याचा फोटो पोस्ट केल्याबद्दल त्याला उन्नी मुकुंदनकडून मारहाण करण्यात आली.

अभिनेत्याने माजी मॅनेजरला फ्लॅटच्या पार्किंगमध्ये बोलावलं आणि मारहाण केली. यानंतर मॅनेजरवर आधी रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि मग त्याने यासंपूर्ण प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. याबद्दल आता स्वत: अभिनेता उन्नी मुकुंदनने त्याची बाजू मांडली आहे. मंगळवारी (२७ मे) रोजी याबद्दल त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आणि सत्य सांगितलं.

अभिनेत्याने विपिन कुमारने त्याच्यावर लावलेल्या मारहाणीचे आरोप फेटाळले आहेत. शिवाय विपिनने त्याच्यासाठी मॅनेजर म्हणून कधी काम केलेलं नाही असंही म्हटलंय. इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये अभिनेत्याने असं म्हटलं, “२०१८ च्या सुमारास जेव्हा मी माझ्या स्वतःच्या निर्मित केलेला माझा पहिला चित्रपट तयार करणार होतो, तेव्हा विपिन कुमार यांनी माझ्याशी संपर्क साधला.”

उन्नी मुकुंदन इन्स्टाग्राम स्टरी
उन्नी मुकुंदन इन्स्टाग्राम स्टरी

यापुढे त्याने असं म्हटलं, “मी कधीही विपिनला माझा मॅनेजर म्हणून नियुक्त केले नाही. त्याने केलेल्या दाव्यानुसार, विपिनवर कोणताही शारीरिक हल्ला झालेला नाही आणि माझ्यावर लावलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.” याशिवाय उन्नी मुकुंदनने असं म्हटलं, “माझ्याबद्दल उगाच अफवा पसरवल्या जात आहेत. त्याने एका महिला अभिनेत्रीशी संपर्क साधून तिला माझ्याशी लग्न करण्यास सांगितले, ज्यामुळे माझ्यात आणि त्याच्यात मोठा वाद झाला.”

उन्नी मुकुंदन इन्स्टाग्राम स्टरी
उन्नी मुकुंदन इन्स्टाग्राम स्टरी

यापुढे अभिनेता म्हणाला, “या व्यक्तीने बोललेला प्रत्येक शब्द खोटा आहे. मी हे सर्व आरोप नाकारतो. तो मला स्वत:च्या फायद्यासाठी धमकावत आहे आणि त्रास देत आहे. माझं करिअर उद्ध्वस्त करण्यास मदत करत आहेत असे मला ठामपणे वाटतं. कठोर परिश्रम आणि चिकाटीने मी माझं आतापर्यंतचं करिअर उभं केलं आहे. जरी मला या सर्व प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत असले, तरी मी सत्यावर विश्वास ठेवतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
उन्नी मुकुंदन इन्स्टाग्राम स्टरी
उन्नी मुकुंदन इन्स्टाग्राम स्टरी

दरम्यान, उन्नी मुकुंदनने त्याच्या करिअरमध्ये प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उन्नीने तमिळ चित्रपट सीदान (२०११) द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मार्को’ चित्रपटातून उन्नी मुकुंदनला जगभरात ओळख मिळाली. ३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘मार्को’ या चित्रपटाने ११० कोटी रुपये कमावले होते. याशिवाय त्यानं ‘जनता गॅरेज’ आणि ‘गरूदन’ सारख्या चित्रपटांतही काम केलं आहे.