अक्षय कुमारच्या आगामी ‘द शौकीन’ चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पियुष मिश्रा यांच्याही भूमिका आहेत.
२७ सेकंदांच्या या मजेशीर मोशन पोस्टरमध्ये ग्लासमध्ये ठेवलेल्या तीन दातांच्या कवळ्या या आपापसात बँकॉकला जाऊन मस्ती करण्याची योजना करताना दिसतात. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झालेल्या बासू चॅटर्जी यांच्या ‘शौकीन’चा रिमेक आहे. यामध्ये क्वीन चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री लीसा हेडन ही अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसेल. ‘द शौकीन’ ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2014 रोजी प्रकाशित
पाहाः अक्षय कुमारच्या ‘द शौकीन’चे मोशन पोस्टर
अक्षय कुमारच्या आगामी 'द शौकीन' चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

First published on: 22-09-2014 at 11:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unveiled motion poster of akshay kumars the shaukeens