बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. सध्या उर्फीला दररोज इस्लामबद्दल प्रश्न विचारले जातात. यावर ती तिच्या स्वत: च्या शैलीत उत्तर देते. उर्फीने पुन्हा एकदा रमजान महिन्यात पाळल्या जाणार्‍या उपवासांबद्दल असे काही वक्तव्य केलं की धर्मगुरुंना नक्कीच वाईट वाटलं असणार.

उर्फी दररोज विचित्र कपड्यांमध्ये दिसत असते. नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फीने परिधान केलेल्या एका पॅन्टवर दुसरी पॅन्ट चिकटवली होती. यावेळी फोटोग्राफर्सने तिला रोझाविषयी विचारले, ज्यावर उत्तर देत उर्फी म्हणाली, “मी देवावर विश्वास ठेवत नाही आणि अल्लाहवर विश्वास ठेवत नाही, मग मी रोझाचा उपवास का ठेवू.” पुढे उर्फी म्हणते की “जेव्हा या सर्व गोष्टी मनापासून होणार नाहीत तर उपवास करण्याचा काय उपयोग.”

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

आणखी वाचा : “मला गुटखा कंपनीच्या ऑफर येतात पण…”, पान मसालाच्या जाहिरातीनंतर अक्षय कुमारचा ‘हा’ जुना व्हिडीओ झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतीच, उर्फीने एक नवीन कार खरेदी केली आहे. यावेळी उर्फीच्या कार पेक्षा तिच्या ड्रेसची चर्चा सुरु होती. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उर्फीने पेस्टल रंगाच्या बॅकलेस ब्रॅलेट आणि पलाझो स्टाइल पॅन्टमध्ये दिसत आहे. लक्ष पूर्वक पाहिल्यावर कळतं की, उर्फीने त्या पँटवरच एक एक्स्ट्रा पँट चिकटवली आहे.