अनेकदा आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे आणि स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी उर्फीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी नवीन रंजन गिरी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा उर्फीला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी उर्फीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा- Video : हृतिक रोशनबरोबर फोटो काढणाऱ्या डिलेव्हरी बॉयला बॉडीगार्डने दिला धक्का; नेटकरी संतापले, म्हणाले, “कंगना म्हणालेली…”

रविवारी उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल स्टोरीमध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत. उर्फीच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ देखील आहे. ज्यामध्ये उर्फी जावेद स्वतःला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा करताना दिसत आहे. उर्फी म्हणते की, ‘माझ्या आयुष्याचा आणखी एक दिवस आणि मला आणखी एक दिवस धमक्या मिळाल्या आहेत. आजारपणातही मी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली आहे.

इन्स्टा स्टोरीमध्ये उर्फी जावेदने पुढे लिहिले आहे की ‘म्हणूनच मी म्हणाले की मीटिंगपूर्वी प्रोजेक्ट्सचे सर्व तपशील जाणून घेणे आवश्यक आहे. यावर कथित सहाय्यक खरोखरच संतापला आणि म्हणाला नीरज पांडेचा अपमान करण्याची माझी हिम्मत कशी झाली? त्याने मला सांगितले आहे की त्याला माझ्या कारचा नंबर आणि सर्व काही माहित आहे आणि मी ज्या प्रकारचे कपडे घालते त्यामुळे मला धरुन मारलं पाहिजे. मी तपशीलाशिवाय मीटिंगला उपस्थित राहण्यास नकार दिल्याने त्यांनी हे सर्व सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही मिळाली आहे धमकी

गेल्यावेळी नवीन गिरी नावाच्या व्यक्तीने अनेक वेळा उर्फी जावेदला दूरध्वनी, व्हाट्सॲपवर संदेश पाठवून बलात्कार करण्याची, तसेच ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यात अश्लील भाषेत वापर करण्यात आला होता. याबाबतची माहिती उर्फीने गोरेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर एका महिला उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी नवीन गिरीविरुद्ध विनयभंगासह अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मंगळवारी नवीन गिरीला अटक केली. तपासात भाड्याच्या खोलीच्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून त्याने तिचा विनयभंग, अश्लील संभाषण करून बलात्काराची धमकी दिली होती. अटकेनंतर त्याला बुधवारी बोरिवलीतील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.