उर्फी जावेद तिचे विचित्र कपडे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. रोज ती नवनवीन लुकमध्ये स्पॉट होते. बोल्ड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी तिच्या अनोख्या आणि विचित्र फॅशनमुळे कायम चर्चेचा विषय ठरते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात येतं. पण ट्रोलर्सना देखील ती सडेतोड उत्तर देते. आता पुन्हा एकदा उर्फीने तिचा एक व्हिडीओ शेअर केलाय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या व्हिडीओत तिने चक्क दगडांचा ड्रेस घातला आहे.

हिला दगडाने मारले पाहिजे, असं उर्फी जावेदला ट्रोल करताना एक युजर म्हणाला होता. युजरच्या या कमेंटमुळे उर्फी चिडली किंवा संतापली नाही, तर तिने दगडांचा ड्रेस बनवला आहे. हटके फॅशनसाठी चर्चेत असणाऱ्या उर्फीने रंगीबेरंगी दगडांपासून एक आकर्षक ब्रा आणि शॉर्ट स्कर्ट बनवला आहे. या लुकमध्ये ती सुंदर दिसत आहे. तुम्हाला तिने दगडांचा ड्रेस बनवलाय, यावर विश्वास बसत नसेल तर तिचा हा व्हिडीओ नक्की पाहा.

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रंगीबेरंगी स्टोन ब्रा आणि स्कर्टमध्ये उर्फी जावेद कहर करत आहे. तिचा जबरदस्त लुक व्हायरल होतो आहे. ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी उर्फीने दगडांचा ड्रेस घालून व्हिडीओ बनवला. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शनदेखील तिच्या कपड्यांप्रमाणेच हटके आहे. “कमेंट्सने मला हे करण्यास प्रोत्साहित केलंय. त्यामुळे मला दोष देऊ नका, तर त्या कमेंट्सला द्या,” असं कॅप्शन उर्फीने व्हिडीओला दिलंय.