मॉडेल उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तिच्या तोकडे कपडे घालण्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आणि नंतर या दोघींमध्ये कलगीतुरा रंगला. चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली. तसेच उर्फीला थोबाडीत मारण्याचंही वक्तव्य केलं. त्यानंतर उर्फीनेही ट्वीट करत चित्रा वाघ यांचा सासू असा उल्लेख केला होता. या वादानंतर उर्फीचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता.

पोलिसांमध्ये जबाब नोंदवल्यानंतर उर्फी ट्विटरवर चांगलीच सक्रिय झाली आहे. तिने हिंदु व मुस्लीम धर्माबद्दल ट्वीट केले होते. एका ट्वीटमध्ये ती हिंदु धर्माबद्दल ट्वीट करत म्हणाली, “प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असत. हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती. खेळ, राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग होता. जा आणि आधी भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या.” यासोबत तिने जुने शिल्प व हिंदू स्त्रीचा प्राचीन काळातील पेहराव दाखवणारा एक फोटो शेअर केला होता.

आणखी वाचा – वनिता खरात व रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पुढे उर्फीने मुस्लीम धर्माबद्दल ट्वीट केलं होतं. “मुस्लीम पुरुषांना वाटतं की ते त्यांच्या पत्नीचे मालक आहेत,” असं ती म्हणाली होती.

दरम्यान, आता उर्फीने शीख धर्माबद्दल ट्वीट केलंय. “मी अजिबात धार्मिक व्यक्ती नाही पण मला गुरुद्वाराची संकल्पना खूप आवडते. लोकांना त्यांचा धर्म, जात, लिंग, रंग, श्रीमंती याची पर्वा न करता जेवायला देणं. शीख आजही अशा भक्तिभावाने लंगर चालवतात, कौतुकास्पद आहे, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे,” असं उर्फीने तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – “…तर दहा जणी नग्न फिरतील” उर्फी जावेद प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ संतप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीच्या या ट्वीटवर नेटकरी प्रतिक्रियाही देत आहेत. ‘चांगली व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही धर्म बदलण्याची गरज नाही’. ‘उर्फी तू अगदी खरं बोलत आहेस’, ‘शीख लोकांबद्दल खूप आदर आहे’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.