आपल्या अतरंगी फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. अनेक तिला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तिचे कपडे कधी एवढे विचित्र असतात की तिचा ड्रेस डिझायनर कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. आताही काहीसं असंच घडलंय. उर्फीनं नुकत्याच शेअर केलेल्या काही फोटोंवर युजर्सनी कमेंट करत तिच्या ड्रेस डिझायनरचं नाव विचारलं आणि उर्फीनंही फोटो शेअर करत तिच्या ड्रेस डिझायनरचा खुलासा केला आहे.


उर्फीनं अलिकडेच निळ्या रंगाच्या अतरंगी ड्रेसमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिचा हा लुक पाहून अनेकांनी कपाळाला हात लावला. अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेट करत तिच्या ड्रेस डिझायनरचं नाव विचारलं. सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना उर्फीनं तिच्या ड्रेस डिझायनरच्या नावाचा खुलासा केला. एवढंच नाही तर तिने त्याचा फोटोही शेअर केला आहे. पण हा फोटो पाहून आता सर्वच हैराण झाले आहेत.


उर्फी जावेदनं तिच्या निळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मला अनेकांनी मेसेज केले आहेत की, या ड्रेसचा डिझायनर कोण आहे. तर आता त्याचा फोटो पाहण्यासाठी उजव्या बाजूला स्वाइप करा.’ उर्फीचे फोटो स्वाइप केल्यानंतर लक्षात येतं की हा ड्रेस डिझायनर एक उंदीर आहे. जो निळ्या रंगाच्या कपड्यावर बसलेला आहे. अर्थात उर्फीनं ही पोस्ट मजेदार अंदाजात शेअर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान उर्फीनं मागच्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले आहेत की, तिला या फोटोंमुळे बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. काहींनी तर, ‘तुझे कपडे उंदराने कुरतडले आहेत की कुत्रा तुझा पाठलाग करत होता.’ अशा आशयाच्या कमेंट केल्या होत्या. उर्फी जावेद तिच्या अशा फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. पण एवढ्या ट्रोलिंगनंतरही ती सकारात्मक दृष्टीकोनातून याला समोरी जाताना दिसत आहे.