सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील शाब्दिक युद्ध तर बरेच दिवस चर्चेत राहिलं. पण उर्फीने मात्र या सगळ्या प्रकरणात माघार घेतली नाही. उर्फीच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र उर्फीने तिची स्टाइल काही सोडली नाही. आता तिच्या चेहऱ्याची विचित्र अवस्था झाली आहे.

आणखी वाचा – Athiya Shetty-KL Rahul Wedding : लुंगी, सदरा अन् कोल्हापुरी चप्पल; लेकीच्या लग्नात सुनील शेट्टीच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

मध्यंतरी उर्फीने अंगभर कपडे परिधान केल्यास तिला अंगावर पुरळ तसेच त्वचा लाल होते हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. शिवाय तिने फोटो अंगभर अ‍ॅलर्जी झाल्याचे फोटोही शेअर केले होते. आता तिने सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो सोशल मीडिया अकाऊंटव्दारे शेअर केला आहे.

उर्फी जावेदची अशी अवस्था का झाली?

उर्फीला पुन्हा एकदा अ‍ॅलर्जी झाली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा अगदी विचित्र दिसत आहे. तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “काय होतं आणि आता काय झालं आहे. जेव्हा मला अ‍ॅलर्जी होते तेव्हा मी कोणासारखी दिसते?” उर्फीच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी तिचा हा फोटो पाहिल्यानंतर उर्फीची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी मेकअप प्रॉडक्ट न वापरण्याचा उर्फीला सल्ला दिला आहे. एका युजरने उर्फीची तुलना राखी सावंतशी केली. तर दुसऱ्या युजरने अंगभर कपडे परिधान केले तर अ‍ॅलर्जीच होणार ना. असं म्हटलं आहे. पण तिला नेमकी कसली अ‍ॅलर्जी झाली आहे हे उर्फीने सांगणं टाळलं आहे.