‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटानंतर अभिनेता विकी कौशल प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. आगामी चित्रपटांसोबतच विकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून विकी आणि हरलीन सेठीच्या अफेअर आणि त्यानंतर ब्रेकअपचीही जोरदार चर्चा आहे. तर कतरिना कैफ आणि विकीमध्ये काहीतरी शिजत असल्याचंही म्हटलं जात आहे. अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने त्याचं रिलेशनशिप स्टेटस सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘होय मी सिंगल आहे,’ असं उत्तर विकीने दिलं. तर ‘मिंगल’ व्हायला तयार आहेस का विचारल्यावर ‘होय, प्रेक्षकांसोबत मिंगल व्हायला तयार आहे,’ असं तो म्हणाला. विकीच्या या उत्तरामुळे हरलीन आणि त्याचं ब्रेकअप झाल्याचं समजतंय.

‘कॉफी विथ करण’ या रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा विकीला त्याचं रिलेशनशिप स्टेटस विचारलं होतं, तेव्हा त्याच्या आयुष्यात कोणीतरी असल्याचं त्याने अप्रत्यक्षरित्या सांगितलं होतं. हरलीन आणि विकीचे काही फोटोसुद्धा त्यादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण कतरिनामुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. हरलीनने विकीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना सुरूवात झाली होती.

विकी कौशलच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. तसेच करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातदेखील तो मुख्य भूमिकेत असणार आहे. करिना कपूर, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uri actor vicky kaushal talked about his relationship status
First published on: 03-04-2019 at 15:26 IST