सोशल मीडियावर कधी कशाचा ट्रेंड लोकप्रिय होईल सांगता येत नाही. अनेकदा सहज सोप्या वाटणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर एवढ्या हिट आणि व्हायरल होतात की तो ट्रेंड फॉलो करण्याचा मोह सेलिब्रेटींनाही आवरत नाही. सध्या असाच एक ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यावर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची गं जोडी’च्या टीमनं एक धम्माल रील शेअर केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर नवं रील ट्रेंडमध्ये आहे. अनेकजण ‘वडापाव खाल्ला काय’ या हटके मराठी रॅपवर रील तयार करताना दिसत आहेत. मग यात आपले मराठी सेलिब्रेटी तरी मागे कसे राहतील. त्यांनी देखील या हटके रॅप साँगवर रील तयार केला आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील कलाकार शिवानी सोनार, मणीराज पवार, श्रुती अत्रे यांच्यासह मालिकेच्या टीमनं हा मजेशीर रील तयार केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता मणीराज पवार आणि राजश्री मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सनी यावर कमेंट करताना हसणारे इमोजी पोस्ट केले आहे. व्हिडीओ एवढा मजेदार आहे की तो पाहत असताना कोणालाच हसू आवरणार नाही. सध्या या गाण्याच्या नव्या ट्रेंडनं सर्वांनाच वेड लावलंय. सर्वात आधी हे रील बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या निशांत भट्टनं शेअर केला होतं. त्यानंतर या रीलनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.