फेब्रुवारी महिना उजाडला की प्रेमात असणाऱ्यांना आणि प्रेमात नसणाऱ्यांनाही वेध लागतात ते म्हणजे व्हॅलंटाइन डे चे. प्रेम, भावना, जवळीक आणि अशा बऱ्याच भावना व्यक्त करण्यासाठी मग आधार घेतला जातो तो म्हणजे चित्रपटांचा. त्यातील दृश्यांचा आणि चित्रपट गीतांचा. रोमान्स, प्रेमात घेतल्या जाणाऱ्या आणाभाका आणि बॉलिवूड हे एक वेगळंच समीकरण तयार झालं आहे. सलीम अनारकलीच्या प्रेमाची कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणणाऱ्या ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटापासून ते अगदी ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘राम-लीला’ या चित्रपटांच्या माध्यमातून विविध कथानकांद्वारे बॉलिवूडने आजवर प्रेमाची परिभाषा अनेकांनाच समजावून सांगितली आहे.
व्हॅलेंटाइन डे चे औचित्य साधत इंडियन एक्स्प्रेसद्वारे करण्यात आलेल्या अशाच एका निरीक्षणामध्ये ही बाब लक्षात अली आहे की, शाहरुखच्या ‘दिल वाले दुल्हनिया’ या चित्रपटातील ‘सरसों के खेत’ मधील शाहरुख (राज) आणि काजोल (सिमरन) चा रोमान्स आजही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे हे या निरिक्षणातून सिद्ध झाले आहे. सरसोच्या (राईच्या) शेतांमध्ये काजोल (सिमरन) तिच्या प्रेमाचू कबुली देते हे दृश्य सध्याच्या घडीलाही अनेकांच्याच्या मनात घर करून आहे. त्यामुळे किंग खान खऱ्या अर्थाने आजही ‘किंग ऑफ रोमान्स’ आहे असेच म्हणावे लागेल. दरम्यान, बॉलिवूडमधील अशाच चित्रपटांमधील प्रेमाची ग्वाही देणारी ही आहेत काही प्रसिद्ध दृश्ये…
हम दिल दे चुके सनम
कुछ कुछ होता है
नमस्ते लंडन
जब वी मेट
हम आपके है कौन
मुघल-ए-आझम
राम-लीला